Back to feed
V
Vihaan Iyer Life · Marathi · Life

मला तुझ्यासारख्या कविता नाही रचता येत मनापासून नाही हसता येत तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे मी फक्त तुझा आणि तु फक्त माझी आहेस...!!१!! मला तुझ्यासारखे गाणे नाही गाता येत हृदयाच्या अंतरंगात नाही जाता येत तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे माझे हृदय तुझे अन तुझे हृदय हेच माझे हृदय आहे...!!२!! मला तुझ्यासारखे डोळ्यात डोळे घालून नाही पहाता येत तुझ्यासारखे नझर चोरून नाही जाता येत तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे तुझी नझर माझ्यावर अन माझ्या नाझारेत फक्त तूच आहेस...!!३!! मला तुझ्यासारखे ढसाढसा नाही रडता येत मनातले दुख नाही सांगता येत तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे माझे सुख तुझे अन तुझे दुख माझे आहे...!!४!! मला तुझ्यासारखे नेहमी आनंदी नाही राहता येत सुखी संसाराचे स्वप्न नाही पाहता येत तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे तूच माझ्या जीवनाचे स्वप्न आणि त्या स्वप्नात फक्त तूच आहेस...!!५!! मला तुझ्यासारखे imotional नाही होता येत सर्वच feelings नाही share करता येत तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे तूच माझे imotions अन माझ्या feelings मधेही तूच आहेस...!!६!! मला तुझ्यासारखे जीवन नाही जगता येत जगाकडे आपलेपणाने नाही बघता येत तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे माझे जीवन तुझ्यासाठी पण तूच माझे जीवन आहेस तूच माझे जीवन आहेस.

194 likes 47 shares
WhatsApp