Back to feed
A
Asha Rao Life · Marathi · Life

*मास्तरांची कर्ज कहानी* ======================= एका डोळयात हासु, एका डोळयात पाणी....!!! ************************** नऊ लाख डोनेशन देणे कबुल झाले हातात खडु घेवुन मास्तर रूजु झाले ! ....🖋 घरातल्या घरात भांड्याला भांड थटु लागलं माय लेकरांचे प्रेम दुधासारखं अटु लागलं सासु -सासऱ्याशी पटेना मॅडम म्हाणाल्या वेगळं राहु चार गुंठे , फ्लॅट हपत्या हपत्या घेवू ! सोसायटीचे दहा लाख पंचवीस लाख गृह कर्ज रंग-रंगोटीसाठी पुन्हा पतसंस्थेत अर्ज ! इतका देखणा बंगला साधी पुजा चालेल कशी नात्यागोत्यांच्या नाकावर बसु नये माशी ! चार चाकीशिवाय बंगला काय शोभत नाही थोडे कर्ज वाढले म्हणून बंगलाकाय डुबत नाही आंधळा विचार मॅडमचा कसा दिसेल धोका ताटाखालच्या मांजराचा झालाच नाही बोका ! बघता बघता घरात तिनदा हलला पाळणा चुकला हिशोब खर्चाचा घेतला नाही खेळणा ! व्याज, हप्ता, कर्ज गणित काय जमेना मास्तराच मन वर्गात सुध्दा रमेना ! हातात किती पगार सांगायची लाज वाटते पुर्वी फुटायची बिअर आता फक्त देशी फूटते उपवर मुलगी लग्नाची पुन्हा झुकली मान सोयऱ्यासाठी पायपिट फाटून गेली वहान ! " आज मास्तर सेवा निवृत्त" कर्ज फेडण्यात गेली हयात आज साठी गाठली पोरांनी हळूच रक्कम फंडाची लाटली ! सुख समाधान शांतीसाठी देवळात जावून बसतात काय कमावले आयुष्यात हिशोब करत असतात ! मांडीवर घेऊन नातवाला मास्तर सांगे कहाणी एका डोळ्यांत हासु दूसऱ्या डोळ्यांत पाणी! 🌹 कविता छान वाटली तर शेअर करा🌹

116 likes 33 shares
WhatsApp