Back to feed
K
Kunal Sharma Patriotic · Marathi · Patriotic

...म्हणून अमावस्येच्या आदल्या रात्री "सर्जिकल स्ट्राईक"! नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील 7 तळ उद्ध्वस्त झाली. यामध्ये 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर 2 पाकिस्तानी सैनिक ठार झाले. या ऑपरेशनसाठी भारतीय लष्कराने जाणीवपूर्वक अमावस्येच्या जवळची रात्र निवडण्यात आली. सर्जिकल स्ट्राईकसाठी अमावस्येच्या आदली रात्र निवडण्यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे, मिट्ट काळोखात कारवाई यशस्वीपणे पार पडू शकते. कारण काळोखात कुणाला साधी सावलीही दिसणार नाही, असा त्यामागील तर्क होता. बुधवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास भारतीय लष्कराने स्पेशल फोर्स कंमांडोंच्या दोन तुकड्या उत्तर सीमेच्या दोन गुप्त ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे एलओसीच्या अगदी उतरवल्या. दोन तुकड्यांमध्ये 4 पॅरा आणि 9 पॅरा होते. या दोन्ही तुकड्यांमधील एकूण 7 प्लाटून हल्ल्यात समाविष्ट होते. कारण एकूण 7 लॉन्चिंग पॅड उद्ध्वस्त करायचे होते. प्रत्येक प्लाटूनमध्ये 15 ते 20 कमांडो होते. एलओसीवर आधीपासूनच डोग्रा आणि बिहार रेजिमेंटचे कमांडो होते.

210 likes 9 shares
WhatsApp