Back to feed
M
Manav Bhat Patriotic · Marathi · Patriotic

म्होरक्यांनो म्होरकी तोंडास घाला, बोलताना बोळकी थोडी संभाळा..... टाळकी फिरल्यापरी बोलू नका रे, थांबवा रे मर्कटि मोकाट चाळा..... पोट तडशी लागले खाऊन चारा चर्वणाला चावता माती कशाला! आलये आदर्श तुम्ही भोगता रे, सैनिकांना धोंडही नाही उशाला..... प्राण वाहून राखले देशास ज्यांनी बाण मारून अर्पिता का शाप,जाळा ? आवरा रे भूक आता खूप झाले , देश ही सोसेल का तुमच्या घशाला ! प्रार्थना ईतकीच आई चंडीकेला, दैत्य मारुन माळ गे तू रुंडमाळा!

75 likes 10 shares
WhatsApp