Back to feed
K
Kavya Bhat Patriotic · Marathi · Patriotic

*महाराष्ट्र दिन* मे १, इ.स. १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आंतरराष्ट्रीय *कामगार दिन* म्हणूनही ओळखला जातो. *महाराष्ट्र गीत* *जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा* ॥धृ.॥ रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा ... ॥१॥ *जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा* भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ॥२॥ *जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा* काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढ़ळाच्या घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥३|| *जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा* सर्वांना *महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या* हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

155 likes 43 shares
WhatsApp