महाराष्ट्रामध्ये प्रथमच लातूर येथे दि 16 आॅक्टोबर 2016 वार रविवार रोजी आयोजित "सैराट हवा" कार्यक्रमा विषयी .................... एक प्रयत्न - उज्ज्वल भविष्यासाठी !!!!!!! मराठवाडय़ातील एका भूकंपग्रस्त भागामधील व सततच्या दूष्काळाचा सामना करत असलेल्या व शैक्षणिक दृष्टया मागासलेल्या परीसरातील उजनी ता औसा येथील काही सुशिक्षित तरुणांनी एकत्रित येऊन श्री स्वामी समर्थ बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा गांधी इंग्लिश स्कूल च्या माध्यमातून पंचक्रोशीतील 35 खेड़यापाड़यामधील जवळपास 500 गरीब शेतकरी व मजूरवर्गातील हूशार होतकरू विद्यार्थीयांना आधुनिक इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्याचे उत्तम असे सामाजिक कार्य चालू आहे ज्यामुळे या स्पर्धेच्या युगामध्ये हे ग्रामीण भागातील आर्थिकदृष्टया मागासलेले विद्यार्थी चांगल्या प्रतीचे शिक्षण घेऊन टिकू शकतील. पण संस्थेच्या अर्थिक अडचणींमुळे विद्यार्थीयांना शाळेची इमारत नसल्यामुळे शिकत असताना ऊन, पाऊस, वारा अशा बर्याच अडचणींचा सामना करावा लागतो कारण शाळा सध्य स्थितीला पत्र्याच्या शेड़ मध्ये चालू आहे. त्यामुळे शाळेच्या इमारत बांधकाम निधी उपलब्ध करण्यासाठी सैराट हवा या चॅरिटी शो चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचा उद्देश हा फक्त मनोरंजन हा नसून तर ग्रामीण भागातील गरीब होतकरू विद्यार्थीयांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याचा एक छोटाशा सकारात्मक प्रयत्न आहे. तर या प्रयत्नाला व उत्कृष्ट अशा या सामाजिक कार्याला आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.तरी शाळेच्या इमारत बांधकामासाठी देणगी देऊन "सैराट हवा " या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. सैराट हवा कार्यक्रमाच्या प्रवेश पास व अधिक माहितीसाठी संपर्क :7447811333/7447811666 धन्यवाद !!!!!!!!
34 likes
26 shares