Back to feed
P
Prisha Singh Love · Marathi · Missing

यालाच म्हणतात का प्रेम....? तिच्या आठवनींची वाढत जाणारी नशा, आणि फक्त तिच्या अस्तित्वानेचखुल नारी प्रत्येक दिशा, यालाच म्हणतात का प्रेम....? तिची क्षणोक्षणी कासावीस करणारी चाहुल, आणि हलुवार मला तिची आठवण करून देणार तीच पैजनाने सजलेल पाउल, यालाच म्हणतात का प्रेम....? तिचा मी अनुभवलेला बेधुंद श्वास, आणि तिने वेड्या गप रे म्हणाव असा मलाप्रत्येक क्षणी होणाराभास, यालाच म्हणतात का प्रेम....? तिच्या आठवणीने माझा कासाविस होणारा जीव, आणि सर्वापेक्षा जास्त प्रेम करूनही तिला न येणारी माझी किव, यालाच म्हणतात का प्रेम....? तिला जाणीव पण न होता माझ्या प्रेमाचाझालेलात िला स्पर्श, आणि हे सर्व वाचून, तिच्या नाजुक ओठावर आलेल्या हास्याचावेड्याअ क्षयला झालेला हर्ष, कदाचीत यालाच म्हणत असतील प्रेम....!

0 likes 0 shares
WhatsApp