Back to feed
N
Nikhil Singh Shivaji · Marathi · Shivaji_Pride

रंकाळा तलाव - कोल्हापूर रंकाळा तलाव कोल्हापूर शहरातील सरोवर आहे. यास कोल्हापूरची चौपाटी म्हणूनही संबोधले जाते. कोल्हापूरच्या प्रेक्षणीय ठिकाणांमधील एक महत्वपुर्ण स्थळ आहे. पूर्वीच्या काळी येथे एक मोठी पथ्थराची खण होती. इ.स. ८०० ते ९०० च्या कालावधीत येथे मोठे भूकंप झाले. या भूकंपांमुळे भूगर्भातील पाणी वाहू लागले. या पाण्यामुळेच येथे मोठा तलाव तयार झाला. या तलावाजवळच रंकभैरव या श्री महालक्ष्मी देवीच्या रक्षकाचे मंदिर आहे. त्यांच्या नावावरनच या तलावास रंकाळा हे नाव पडले. पुढे शिवाजी महाराजांनी या तलावाचे रुपच बदलले. कोल्हापूरमधील प्रेक्षणीय स्थळ म्हणून रंकाळा तलावाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या रमणीय ठिकाणी संध्याकाळच्या वेळी कोल्हापूरमधील बहुसंख्य नागरिक मोठया संख्येने फिरावयास जातात. रंकाळ्याचा उल्लेख कोल्हापूरची "मरीन ड्राईव्ह" असा केला जातो. रंकाळा तलाव शहराच्या नैऋत्य टोकाला आहे. त्याचे क्षेत्र सुमारे २०२.३४ हेक्टर असून खोली जवळजवळ १०.६७ मीटर आहे. हल्ली तलावाचे पाणी शेतीसाठी उपयोगात आणले जाते. तलावातील पाणी सोडण्यासाठी एक दरवाजा बांधला आहे. तळयाकाठी शालिनी राजवाडा असून राजवाडयाच्या भव्यतेमुळे रंकाळयाच्या वैभवात अधिकच भर पडली आहे. पूर्व बाजूला आणि थोडयाफार अंशी खुद्द तळयामध्ये संध्यामठ आहे. हा मठ म्हणजे प्रशस्त मंडप असून त्याची बांधणी हेमांडपंथी पद्धतीने केली आहे. मठाची वास्तू हल्ली सुस्थितीत नाही. पावसाळयामध्ये तलाव जेव्हा भरून वहातो तेव्हा संध्यामठ पूर्णपणे पाण्यात बुडतो. रंकाळयाजवळ पद्‌माराजे उद्यान आहे. तळ्याला रंकाळा हे नाव रंक भैरव या देवाच्या नावावरून देण्यात आलेले आहे. रंक भैरव महालक्ष्मीच्या अतिशय मर्जीतला होता असे म्हणतात. रंकाळा तलावाची सुरूवात त्याजागी दगडाची एक खाण खणण्यापासून झाली. रंकाळा ही कोल्हापूरच्या प्राचीन सहा वसाहतीपैंकी एक असून तेथे वर नमूद केलेला संध्यामठ तसेच एक नंदीची मोठी मूर्ती असलेले देवालय आहे. ब्रह्मपूरीशी संबंध नसलेले रंकाळा हे त्यावेळी एक स्वतंत्र खेडे होते. या भागाला पूर्वी नवा बुधवार असे नाव होते. शहराची वाढ होत गेली तेव्हा रंकाळा भागही कोल्हापूरात समाविष्ट झाला.

250 likes 72 shares
WhatsApp