Back to feed
V
Vanya Rao Love · Marathi · Rain

रंग उधळूनी नवे झाला पाऊस मोकळा, वेड लागले जीवाला जीव तरारुन गेला. वेडा पाऊस पाऊस मन झुल्यावर झुले, मन आनंदाचे डोही मन फुलांसंगे फुले. गेला पाऊस पाऊस क्षण नवेच देऊनी, जुनं टाकून ते द्यावे बस्स आठव ठेवूनी.

0 likes 0 shares
WhatsApp