Back to feed
K
Kunal Kapoor Life · Marathi · Life

रुजायच! आजी म्हणायची नेहमी " पोरी ! झाडं आणि नाती सारखीच असतात स्वभावानी... रुजायचं असेल ना त्याला मनापासून तर खत ,पाणी, सूर्यप्रकाश उन या कशाचीच अपेक्षा न करता रुजतच ..... आणि रुजायचं नसेलच तर कितीही जतन करायचा प्रयत्न केला तरी नाही जीव धरत ..." आज कळतोय तिच्या बोलण्याचा अर्थ मी सगळेच प्रयत्न केले माझ्या या हातानी .... तरी सुद्धा जीव धरला नाहीच ना आपल्या नात्यांनी !!!!!

206 likes 29 shares
WhatsApp