Back to feed
M
Myra Deshmukh Love · Marathi · Rain

रित्या ओंजळीत घन बरसू लागले, थेंब धरून ठेवण्या मन तरसू लागले. श्वास श्वासातच गुंते मिटे पापण्या हळूच, खोल सूरांचे हे बोल आत गरजू लागले . मन भिजले भिजले संगे सूरांची ही वाट, रिती ओंजळच पुन्हा क्षण निसटू लागले.

0 likes 0 shares
WhatsApp