Back to feed
R
Rudra Chauhan Life · Marathi · Life

*रयत शिक्षण संस्था,सातारा* येथे नुकताच *इन्फोसिस फौंडेशनच्या* अध्यक्षा सौ.सुधा मुर्ती यांचा नुकताच *रुपये २.५ लाखाचा* लक्ष्मीबाई पाटील राष्र्टीय पुरस्कार देऊन सत्कार करण्यात अाला. सौ.सुधा मुर्तींनी त्याची परतफेड म्हणुन *रु १० लाखाची* देणगी रयत शिक्षण संस्थेला अनाथ विद्यार्थ्यांसाठी दिली हा झाला मनाचा मोठेपणा..... पण सौ.सुधा मुर्ती यांच्या बाबतची अाश्चर्यकारक माहीती तुम्हाला माहीत अाहे का ? सुधा मुर्ती ह्या प्रसिध्द अशा *१०,००० कोटी* चा व्याप असलेल्या इन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्षा असुन दरवर्षी त्या १०० कोटी पेक्षा जास्त रक्कम देणगी म्हणून दान करतात. तरीही अतिशय साधी राहणी ठेवण्याकडे त्यांचा *खास कटाक्ष असतो...सुधा मुर्ती नेहमी ज्या साड्या घालतात *त्या साड्या कमी किंमतीच्या असतात.* पर्स २०० ते ४०० रुपयाची असते. मनगटी घड्याळ वेळ बघता अाली म्हणजे फार झाले म्हणून घड्याळही साधे सुधे ८००—९०० रुपयाचे असते. मोबाईल ७ ते ८ हजाराचा .. फेसबुक, व्हाटसअॅप मध्ये १५—१५ दिवस लक्ष घालत नाही. पायातील चप्पल सुध्दा महागडी नसते. कोणत्याही ब्रॅन्डेड वस्तु वापरत नाही. घरातील सर्व कामे स्वत:च करतात. नातेवाईक व मित्रपरिवार यांचे घरातील सर्व लग्न व दु:खद प्रसंगी हजर राहतात. *लाख- दिड लाख महीना कमवणार्‍या माणसांच्या बायका एखाद्या लग्नात अंगावर दागिने , महागड्या साड्या घालून इतरांना तुच्छ लेखत हाय-फाय राहणीमानात स्वत:ला मिरवत असतात पण *सौ.सुधा मुर्तींचा तिथे प्रवेश झाल्यावर* तेथील अहंकारी नजरा क्षणार्धात लाजेने खाली झुकतात.. *हजारो कोटीची सम्राज्ञी* असलेल्या *सुधा मुर्तींचा* साध्या राहणीमानातला तेथील वावर सर्वांना *अचंबित* करुन सोडतो, अापण कोण अाहे हे विसरुन *इतरांना मोठेपणा* देत ही बाई जेव्हा सर्वांची स्वत:हून पुढे जाऊन अास्थेने चौकशी करु लागते तेव्हा *मी मी म्हणणार्‍यांचा अहंकार क्षणार्धात गळून पडतो..*

216 likes 51 shares
WhatsApp