Back to feed
A
Aarav Rao Friendship · Marathi · Friendship

रेल्वे स्थानक बलात्कार, आरोपीस अटक नाही ठाणे/कल्याण : अल्पवयीन मुलीला लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणात फरार दाखवलेला आरोपी अनिल अवसरमोल याला लागलीच अटक न करता गरज भासेल तेव्हा पोलीस ठाण्यात हजर करण्यासंदर्भात लेखी आश्वासन त्याच्या आईकडून घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मुंब्रा येथे राहणाऱ्या १७ वर्षांच्या पीडित मुलीचा वडिलांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यामुळे तिने घर सोडून कल्याण स्थानक गाठले. त्या वेळी कल्याण स्थानकातील शौचालयाची साफसफाई करणाऱ्या अनिलने तिला पाहिले. ती एकटी असल्याने अनिलने तिला सहानभूती दाखवत आसरा देण्याचा बहाणा केला. त्याने तिला फलाट क्रमांक दोन-तीनवरील महिलांच्या शौचालयात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर रात्री उशीर झाल्याने तिला खडवली येथे मित्राच्या घरी नेले. दुसऱ्या दिवशी त्याने तिला टावरीपाडा येथील घरी नेले. तेथे तिला चार-पाच दिवस ठेवले. अनिल आपल्याशी लग्न करेल, अशा भाबड्या आशेवर ती मुलगी त्याच्यासोबत राहत होती. तिने लग्नाबाबत विचारणा करताच त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने अनिलला धडा शिकवण्यासाठी खडकपाडा ठाण्यात तक्रार दिली. अत्याचाराचा पहिला प्रकार हा कल्याण रेल्वेच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा तेथे प्रथम दाखल होईल, असे खडकपाडा पोलिसांना वाटले. मात्र, आपल्या हद्दीत असा कोणताच प्रकार घडला नाही, अशी भूमिका कल्याण रेल्वे पोलिसांनी घेतल्याने खडकपाडा पोलिसांना गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिल्याचे कल्याण पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी

41 likes 61 shares
WhatsApp