Back to feed
D
Dhruv Mehta Life · Marathi · Life

*लोकायत’च्या संस्थापक, अर्थतज्ज्ञ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुलभा ब्रह्मे यांचे निधन!* ----------------------------------------------- लोकविज्ञान संघटना,शंकर ब्रह्मे समाजविज्ञान ग्रंथालय आणि *लोकायत* याद्वारे त्यांनी सामाजिक कार्य आणि लिखाण केले आहे..! जागतिकरण, मुक्त व्यापार धोरण,सेझ प्रकल्प,जैतापूर अणुऊर्जा यांच्या *विरोधातील लोकचळवळीत त्यांचा पर्यावरण संवर्धन आणि मानवी जीवनाच्या शाश्वत विकासाची संकल्पना* घेऊन सक्रिय सहभाग होता....! अलीकडच्या काळात भाजपा सरकारने केलेल्या गोवंश हत्याबंदीचा निषेध करून *गोवंश हत्याबंदीचा आर्थिक आणि सामाजिक दुष्परिणाम विषद करणारी त्यांची पुस्तिका संपूर्ण देशभरात चर्चेची ठरली होती...!* आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी *भांडवली आणि ब्राह्माणी मानवताविरोधी मूल्यांची चिकीत्सा करून पर्यायी विकासनीतीच्या अजेंड्यावर काम केले*...तसे काम करणाऱ्या व्यक्ती संस्था संघटना आणि चळवळींना मनापासून मदत केली! कायम सतत उत्साही व हसरा चेहरा ...खुप्प बोलायचे व ऐकायचे असायचे नेहमी त्यांना ... अत्यंत साध्या घरात पुस्तकांचे ढीगच्या ढीग पडलेले असत ...त्यावर कपडा झाकलेला असे ... ते सगळे बघून मला नेहमीच त्यांचा हेवा वाटे ... माणसे किती साधेपणाने परंतु त्याचवेळी किती समृद्ध आयुष्य जगू शकतात ह्याची मी स्वता बघितलेली हि उदाहरणे .... *सुलभाताईंना व त्यांच्या कार्याला अखेरचा सलाम...!*

189 likes 38 shares
WhatsApp