Back to feed
M
Manav Joshi Patriotic · Marathi · Patriotic

वाचता वाचता :- ----------------------------------------------------------------- . • इंग्लंडचा मर्यादित क्रिकेट संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गन आणि फलंदाज ॲलेक्स हेल्स यांनी सुरक्षेच्या कारणावरून बांगलादेश दौऱ्यातून माघार घेतली • ऑलिंपिक स्पर्धेतील ब्राँझपदकाच्या कामगिरीने भारताची महिला कुस्तीगीर साक्षी मलिक ५८ किलो वजनी गटात युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर • आर्मी ग्रीन संघाने उ नेरोका फुटबॉल क्लतबचे आव्हान पेनल्टी शूट आउटमध्ये ६-५ असे परतवून लावत १२८व्या ड्युरंड करंडक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले * भारतीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष डॉ. नरिंदर बात्रा यांना आंतराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या (एफआयएच) अध्यक्षपदासाठी नामांकन • भारतीय कुस्तीगीर महासंघाने ‘पद्मभूषण’ या सर्वोत्तम नागरी पुरस्कारासाठी सुशीलकुमारच्या नावाची शिफारस केली. • ऑलिम्पिकच्या कालखंडातील एका मद्यधुंद रात्री आपल्याला बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याचे खोटे नाटय़ रचणाऱ्या अमेरिकन जलतरणपटू रयान लॉचटेला दहा महिने बंदीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जाणीवपूर्वक कुभांड रचणाऱ्या ३२ वर्षीय लॉचटेला २०१७च्या मध्यापर्यंत व्यावसायिक जलतरणापासून दूर राहावे लागणार आहे. त्यामुळे बुडापेस्ट येथे होणाऱ्या विश्व अजिंक्यपद जलतरण स्पध्रेलाही त्याला मुकावे लागणार आहे, • द्विस्तरीय कसोटी सामन्यांच्या पद्धतीच्या प्रस्तावाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केलेला विरोध लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) तो मागे घेतला आहे. भारताबरोबरच श्रीलंका, बांगलादेश व झिम्बाब्वे यांनीही या प्रस्तावाला विरोध केला होता • टी २० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने सर्वोच्च धावसंख्येच्या विक्रमाला गवसणी घातली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी २० सामन्यात ग्लॅन मॅक्सवेलच्या ६५ चेंडूत १४५ धावांच्या आधारे ऑस्ट्रेलियाने २० षटकांमध्ये २६३ धावां केल्या टी २० क्रिकेटमध्ये हा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम ठरला आहे. यापूर्वी श्रीलंकेनेच २००७ मध्ये केनियाविरुद्ध खेळताना २० षटकांमध्ये ६ गडी गमावत २६० धावा केल्या होत्या. यानंतर ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलियाने २०१३ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना २० षटकांमध्ये ६ गडी गमावत २४८ धावा केल्या होत्या. टी २० सर्वोच्च धावा करणा-या फलंदाजांच्या यादीत मॅक्सवेल दुस-या स्थानी पोहोचला * झी मिडिया नेटवर्कने आपल्या टेन स्पोर्ट्स या खेळांचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीची विक्री केली आहे. सोनी पिक्चरने तब्बल २५७९ कोटींना या वाहिनीचे मालकी हक्क विकत घतले. झी मिडियाने टेन स्पोर्ट्स ही वाहिनी २००६ मध्ये अब्दुल रेहमान बुख्तरी ताज ग्रुपकडून खरेदी केले होते. * कर्नाटकने 20 सप्टेंबरपर्यंत दररोज 15 ऐवजी 12 हजार क्यु्सेक पाणी तमिळनाडूला द्यावे, असा नवा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. • केंद्र सरकारच्या सल्ल्यास न जुमानणारे अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ज्योतीप्रसाद राजखोवा यांना आज अखेर पदमुक्त करण्यात आले. मेघालयचे राज्यपाल व्ही. षण्मुगनाथन यांच्याकडे अरुणाचलच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी तत्काळ देण्यात आली * सिंगूर लढ्याचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय अहमदाबाद येथील प्रसिद्ध इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेंजमेंटने (आयआयएम) घेतला • चीनमधील ग्वेझोऊ प्रांतात नदीवरील जगातील सर्वांत उंच पूल बांधण्याचे काम सुरू असून तो लवकरच पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होणार आहे. नदीपासून तब्बल 565 मीटर (1,854 फूट) उंचीवर हा पूल आहे * भीषण दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्याची पिण्याच्या पाण्याच्या टंचाईतून कायमस्वरूपी मुक्तता करण्यासाठी गावे व शहरांना बंद पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करणारी तेलंगणच्या धर्तीवर "मिशन भगीरथ‘ ही वॉटर ग्रीड योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला मिशन भगीरथ ही तेलंगणा राज्याची पाणीपुरवठा योजना आहे. • राजधानी नवी दिल्लीच्या प्रशासकीय प्रमुखपदी नायब राज्यपालच आहेत" या उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याची "आम आदमी पार्टी"ची (आप) विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

72 likes 27 shares
WhatsApp