वजाबाकी करण्याची एक ट्रिक : ____ अनेकवेळा दुकानात / भाजी,फळे ,तिकिट घेताना १०० , १००० ची नोट दिल्यावर किती पैसे परत मिळायला हवेत याचे गणित करायला ही ट्रिक आपल्यालाही उपयुक्त . 🔶 10, 100,1000, 10000 अशा संख्येतून कोणतीही संख्या कशी वजा करायची 🔶 उदा: आपल्याला 1000- 674 वजा करायचे? यासाठी आपणाला पहिले अंक 9 मधून वजा करून घ्यायचे व शेवटचा अंक 10 मधून वजा करून घ्यायचा. म्हणजेच 9-6 =3 9-7 = 2 10- 4= 6 तुमचं उत्तर तयार= 326 आपण आणखी एक उदाहरण पाहू. 10000 - 4328=? सुरुवातीला 9-4=5 9-3=6 9-2=7 10-8=2 तुमचं उत्तर तयार आहे- 5672 उदा:3) 100000-66758 सुरुवातीला 9-6=3 9-6=3 9-7=2 9-5=4 10-8=2👌👌 *स्पर्धा परीक्षेत जलद उत्तर काढण्यासाठी ही ट्रिक उपयोगी पडेल* यात शंका नाही. मनोरंजनातून गणित हा उद्देश तसेच गणित विषयक गोडी लावण्यासाठी अशा प्रकारच्या tricks चा✌✌✌✌ अध्यापनात वापर होणे आवश्यक.
192 likes
11 shares