Back to feed
S
Saanvi Reddy Love · Marathi · Missing

वाट पहातय कुणी तरी कुणाची कशासाठी तरी हे त्या कुणाला कसे बर कऴवावे मनांतून ओठावर येता येता परत मनात घरंगऴणा-या अव्यक्त भावनांचे काहूर त्या कोणापासून आणखी किती बर लपवावे त्याच्या बद्धल च्या उचंबऴून येणा-या आठवणींच्या च पाउलखूणा पसरल्यात मनाकडून मेंदूकडे जाणा-या विचारांच्या मायाजाऴाभवती डोऴे तर आहेत जणू फक्त त्याची वाट पहाण्यापुरते अन् त्याच्या आठवणीत सतत पाझरण्यापुरते न बदलणा-या बुरसट वर्तमानाच्या चिखलात बरबटून ही त्यातच निपचीत पडून रहावे की त्या चिखलाला नुकत्याच मजवर बरसणा-या प्रेमवर्षावांनी धुवून टाकून त्यातून मिळणा-या ओलाव्यातूनच या मनमोग-याला फुलवावे माझ्या मनीच्या या द्विधा मनस्थितीला त्याच्या मनाने कधीतरी उमगावे आणि कधीतरी म्हणावे मला ही सखे, जाणून आहे बर मी ही सगऴी तगमग तूझी फुलतील असेच मनमोगरे माझें ही एक दिवस तोवर........ जरा वाट बघ....जास्त नाही पण थोडी वाट बघ.

0 likes 0 shares
WhatsApp