Back to feed
N
Navya Mehta Love · Marathi · Missing

वाटल नव्हत कधी असही कधी घडेल.....! एकगोड सोनपरी माझ्या प्रेमातपडेल.. इटुकल्या - पिटुकल्या मेसेज मधून मला वाकुल्या दाखवेल... हळूच एखादा MISSCALL करून मला ती सतावेल... वाटल नव्हत कधी असही कधी घडेल...! स्वप्नामध्ये माझ्या हळूच कोणीतरी शिरेल... बोलायला "काहीच नाही" म्हणूनफोनवर तासभर बोलेल... आणिनेमक महत्वाच बोलताना फोन ठेवण्याची घाई करेल... वाटल नव्हत कधी असही कधी घडेल...! माझ्याही आठवणीत रात्रभरकोणीतरी जागेल... तिच्या विरहाचे चार दिवस चार जन्माचे अंतर दाखवेल... आणितास-दोन तासांची भेट सुद्धा क्षणभरवाटेल... वाटल नव्हत कधी असही कधी घडेल...! या एकाकी जीवना मध्ये त्यापरीचा प्रेमाचा स्पर्श लाभेल... वाटल नव्हत कधी असही कधी घडेल...! एकगोड सोनपरी माझ्या प्रेमातपडेल.!

0 likes 0 shares
WhatsApp