Back to feed
I
Ishaan Gupta Patriotic · Marathi · Patriotic

वर्गामध्ये 7 वी च्या विद्यार्थ्यांनी मला एक प्रश्न विचारला. सर, *पाकिस्तान आपल्या देशात आतंकवादी घुसवून आपल्या सैनिकांवर हल्ला करतो, मग आपण च्यांच्याशी युद्ध का करत नाही?* *संदिप शिरसाट* *वि.मं. आरे ता.करवीर* आत्ताच्या पिढीतील लोकांनी युद्ध पाहिलेलं नसल्यामुळे त्यांना युद्धज्वर चढला आहे. *आपल्याकडे शक्ती असूनही नरेंद्र मोदी साहेब का आक्रमणाचा आदेश देत नाही?* पाकिस्तान समस्येवरील उत्तर सर्वकष युद्ध नसुन छुपं युद्ध हाच आहे आणि युद्ध करायचंच असल्यास आपल्याला सर्वोच्च त्यागाला तयार असलं पाहिजे. बांगलादेश युद्ध भारताला १९७१ साली अंदाजे ४०० कोटी रूपयांना पडलं होतं. कारगील युद्ध १९९९ साली अंदाजे १०००० कोटी रूपयांना पडलं होतं. फ्रुटीच दहा पंधरा रूपयांना मिळणारं पाकिट सियाचिनला पोहचेपर्यंत अंदाजे दोनशे रूपयांना पडत. सैनिकी जॅकेट प्रतिमाणशी दिड ते दोन लाख रूपये. एक न्युक्लियर मिसाईल साधारणपणे बारा कोटी रूपयांना पडते. भारत-पाकिस्तान युद्ध *आण्विक हल्ल्यापर्यंत* पोहचलं तर कोट्यावधी लोकांना जीव गमवावा लागेल. एखादी इमारती उभी करताना जे स्टीलचे बार वापरले जातात ते बार सुद्धा आण्विक हल्ल्यात पाघळतात, मानवी शरीरांच काय होईल याची कल्पना तुम्ही करू शकता. डोळे गेले , कान फुटले, हात पाय तुटले, आतडी त्वचा केस गळुन पडले अशा लोकांच्या संख्येचा हिशोब नसेल. बॉंम्ब ज्या ज्या ठिकाणी पडेल त्या ग्राऊंड झिरोवरील मानवी वावर कित्येक वर्षांसाठी ठप्प असेल. मुंबई जवळ समुद्र असल्याने समुद्रात त्सुनामी लाटा येतील त्यामुळे अजुनच हानी होईल. भारत पाकिस्तान आण्विक युद्धात अंदाजे ५० लाख टन कार्बन संपुर्ण जगात पसरेल. संपुर्ण आशिया खंडावर काळ्या ढगांची छाया पडलेली असेल. भारत पाकिस्तानचे शेजारी असलेल्या इराण , चिन, भुतान, बांगलादेश , नेपाळ , श्रीलंका , मालदिवला देखिल परिणाम भोगावे लागतील. ओझोन लेयरला मोठी छिद्र पडतील ज्याचा परिणाम म्हणुन त्वचा अतिनील किरणांनी भाजुन निघेल. वातावरण कित्येक महिने दिवसांसाठी थंडगार पडुन जाईल. संपुर्ण जगाच्या वातावरणात बदल घडेल. संपुर्ण दळणवळण आणि संपर्क यंत्रणा ठप्प पडतील. अन्नपदार्थाचे साठे आणि उत्पादन उध्वस्त झाल्यामुळे जिवनावश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण होईल आणि भारताला परदेशी मदतीवर अवलंबून रहावे लागेल परंतु दळणवळण यंत्रणा बंद असल्यामुळे परिस्थिती आणखीनच भिषण होईल. अन्नपदार्थांसाठी दंगली उसळतील.रिणाम पुढील कित्येक पिढ्यांना त्याची फळं भोगावी लागेल. भारत येत्या काळात महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे युद्ध केल्यास अजून 20-30 वाट पहावी लागेल. भारताला एन.एस.जी. चे सदस्यत्व मिळू नये यासाठी चीनला एक मुद्दा होईल आणि भारताला कधीच सदस्यत्व मिळणार नाही. अशा अनेक आंतरराष्ट्रीय संघटना आहेत जिथे अजून भारत सदस्य नाही. त्या संघटनेची दारे पूर्ण बंद होतील. एकूणच पाकिस्तान मरण्याकाठी आलेल्या माणसासारखा शेवटच्या घटका मोजतोय आणि त्याला मारण्याचे पातक आपल्या माथी येईल. *पाकिस्तान युद्धामध्ये 100% हारणार पण जर युद्ध झाले भारत तर भारत जिंकला असेही म्हणता येणार नाही.* *आत्ता भारताचे जबाबदार नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं?* *पाकिस्तनची सर्व बाजूंनी कोंडी करून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडणे व छुपे युद्ध चालू ठेवणे हा सर्वांत चांगला पर्याय आहे असे मला वाटते.* आणि आपले पंतप्रधान ते करण्याची रणनिती आखत आहेत याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 एक देशभक्त 🇮🇳🇮🇳🇮🇳जय हिंद🇮🇳🇮🇳🇮🇳

258 likes 83 shares
WhatsApp