Back to feed
R
Reyansh Singh Life · Marathi · Life

वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे मातीमध्ये दरवळणारे हे गांव माझे जल्लोष आहे आता, उधाणलेला स्वर धुंद झाला, मनी छेडलेला शहारलेल्या, उधाणलेल्या, कसे सावरावे स्वप्नातले गांव माझ्या पुढे दिवसांचा पक्षी अलगद उडे फांदीच्या अंगावरती चिमणी ही चिवचिवणारी झाडात लपले सगे सोयरे हा गांव माझा जुन्या आठवाचा नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा ढगात उरले पाउसगाणे कसे साठवावे हातातले हात, मन बावरे खडकाची माया कशी पाझरे भेटीच्या ओढीसाठी, श्वासांचे झुंबर हलते शब्दांना कळले हे गाणे नवे ही वेळ आहे मला गोंदणारी ही धुंद नाती गंधावणारी पुन्हा एकदा उरी भेटता कसे आवरावे गीतकार : दासू वैद्य, संगीतकार : अजय-अतुल, गायक : कुणाल गांजावाला, चित्रपट : सावरखेड एक गांव (२००४)

18 likes 38 shares
WhatsApp