व्हॉट्सऍपच्या आठ-दहा थ्रेड्सवर एकाच वेळी चॅटिंग करणं फार जिकिरीचं आणि जोखमीचं काम असतं बघा... कुठे काय टाईप केलं जाईल सांगता येत नाही... मग सारखं "Sorry wrong window " हे सांगावं लागतं... माझ्या एका मित्राने तर, "बायको माहेरी गेलीये. घरी कोणीच नाही. उद्या येशील का?" हा मेसेज, स्वतःच्याच बायकोला पाठवला ...! मग येणेप्रमाणे सारवासारव ....."अगं तो मेसेज "पेस्ट कंट्रोल" च्या माणसाला पाठवत होतो" हे बायकोला पटवून देण्यामध्ये त्याचा आख्खा 1GB चा डेटा पॅक संपला... बायकोला कसं बसं पटलं... आणि ती माहेराहून परत आली... आणि जबरदस्ती पेस्ट कंट्रोल करावा लागला.. तात्पर्य : टाईप केलेलं सेंड करायच्या आधी ते कोणाला पाठवतोय ते नीट बघत जा.......नाहीतर काही कारण नसताना पेस्ट कंट्रोल करायला लागेल घराचा...! 😍पेस्ट कंट्रोल पेक्षा पोस्ट कंट्रोल केल्याने आयुष्य सुखी होते 😎😎😉😉😉😉☺☺☺☺
106 likes
19 shares