Back to feed
S
Sahil Malhotra Life · Marathi · Life

*श्री अमिताभ बच्चन* यांचा एक सुंदर लेख ......... *आई आणि पत्नी यांचे मध्ये काय फरक आहे*....... दोघी आपल्यावर *प्रेम* करतात . दोघी आपल्यासाठी *त्याग* करतात . दोघी आपल्यासाठी आपल्याला हवे असते त्या पेक्षा जास्त खायला देतात . दोघी आपल्या वास्तुला *घरपण* देतात . दोघी आपल्यासाठी *प्रार्थना* करतात . दोघी आपल्या सुखासाठी सदैव तत्पर असतात दोघी आपल्यासाठी झटतात ....... मग आपण आपल्या पत्नी बद्दल नेहमी विनोदी पोस्ट करुन हसतो आणि आई बद्दल मात्र चांगल्या आदर युक्त पोस्ट , विचार आपण नेहमीच करतो ......... माझ्या मते फरक इतकाच आहे कि , एक तुम्हाला या जगात आणते ...... आणि दुसरी तुम्हाला तीचे जग बनविते . परंतु माणस नेहमीच पत्नीला गृहित धरतात . आणि महत्वाच्या बोलणी करताना , निर्णय घेताना , योजना करताना तीच्याकडे दुर्लक्ष करतात . ....... कारण त्यांना वाटत कि , पत्नी वरील प्रसंग हाताळण्यासाठी असमर्थ आहे . प्रिय माणसा हे खरे आहे कि तुमची आई तुम्ही नेते बनण्यासाठी तुमच्या साठी त्याग करते पण पत्नी त्याग करते ते तुम्ही सदैव नेतेच रहावे या साठी ....... तुम्ही तुमच्या आईस आयुष्यभर प्रेम देता आणि तीची काळजी घेता . पण पत्नीची काळजी तेंव्हाच घेता जेंव्हा ती मृत्युच्या समीप असते . ...... ती वाट पहात असते तीच्या तुमच्याप्रती समर्पणाबद्दल तुमच्या कडुन मिळणा-या प्रमाणपत्राची . कृपया पत्नीला तीच्या सुरुवातीच्याच आयुष्यात इतक महत्व द्या कि तीला वाटेल कि ती फक्त्त तीच्या वडिलांची *राजकन्याच* नाही तर ती तीच्या नवऱ्याची *राणी* देखील आहे .

73 likes 90 shares
WhatsApp