Back to feed
R
Reyansh Das Life · Marathi · Life

*श्री संत नामदेव* *मनुष्य करिसी तरी भक्तीचेनि मिषें।* *तुझें द्वारीं वसे ऐसे करी॥१॥* *श्वान करिसी तरी उच्छिष्टाचेनि मिषें।* *तुझें द्वारीं वसे ऐसे करी॥२॥* *पक्षी करिसी तरी चारियाचेनि मिषें।* *तुझें द्वारीं वसे ऐसे करी॥३॥* *झाड करिसी तरी तुळसीचेनि मिषें।* *तुझें द्वारीं वसे ऐसे करी॥४॥* *वृक्ष करिसी तरी मंडप मखाचेनि मिषें।* *तुझें द्वारीं वसे ऐसे करी॥५॥* *पाषाण करिसी तरी रंग ।शिळेचेनि मिषेॅ।* *तुझें द्वारीं वसे ऐसे करी॥६॥* *उदक करिसी तरी सडियाचेनि मिषें।* *तुझें द्वारीं वसे ऐसे करी॥७॥* *नामा म्हणे विठे कीर्तनाचेनि मिषें।* *तुझें द्वारीं वसे ऐसे करी॥८॥* ~~~~~~~~॰~~~~~~~ श्री संत नामदेव महाराज या आपल्या उत्कृष्ट अभंगात एकचित्ततेने म्हणतात की, *"देवा, कोणत्याही मिषाने का होईना पण तुझी संगत घडावी. कुत्र्याच्या जन्मास आलो तर तुझ्या दारचे उष्टे खाण्यास माझी योजना केलेली असो. पक्षी झालो तर तुझ्या घराजवळच चारापाण्याची व्यवस्था असु दे. झाडाचा जन्म दिला तर तो तुझ्याच समोरील वृंदावनातील तुळशीचा असो. मोठा वृक्ष झालो तर तुझ्या देवळाचा खांब म्हणून माझा देह कारणी लागो. दगड जरी झालो तर तुझ्याच मंदीराची मी पायरी होईन."* काय योगायोग पहा. देव काय करील ते खरे, आपल्या हातून घडवील ते योग्यच असेल अशी श्रद्धा असणारे, ज्वलंत निष्ठेचे उदाहरण असणार्‍या *श्री नामदेव महाराजांचा देह पंढरपूराला पायरी होऊनच राहीला आहे.* © *श्री नामदेव गाथा व अभंगवाणी* 🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🚩

173 likes 2 shares
WhatsApp