*श्रीगणरायाची मुर्ती केव्हा,कधी,कशी आणावी *आणि श्री च्या आवडत्या मोदकाचे तेविस (23) प्रकार* || जय गणेश || || ॐ गं गणपतेय नमः || || ॐ श्रीं चिंतामणी प्रसन्न || कोणतेही शुभकार्याचा आरंभ करण्यासाठी आपण ज्या देवतेला पुजतो आणि ज्यांना प्रथम पुजेचा अधिकार प्राप्त आहे असे चौसष्ट कला, अष्टसिध्दी आणि श्री बुध्दीचे देवता असे श्री गणपती यांच्या आगमनाला काहीच दिवस राहिले आहे आपण वर्षभर मंदीरात म्हणजे देवाच्या घरी जाऊन देवाचे दर्शन घेतो मात्र भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला रोजी श्री गणपती हे साक्षात आपल्या घरी येतात शास्त्रा प्रमाणे आपण कोणतेही शुभकार्य शुभमुहूर्तावर केल्यावर ते कार्य आयुष्यभर लाभदायक होते या नुसार श्री गणपतीला विघ्नहर्ता आणि सुखकर्ता आपल्या घरी मुहूर्तावर आणल्यास वर्षभर येणाऱ्या विघ्नांचा नाश होतो. कोणतेही शुभ कार्याचा, नविन कार्याचा प्रारंभ या दिवशी करतात.हे मुहूर्त पुर्ण शुद्ध असल्यामुळे या दिवशी इतर दिवसांप्रमाणे कोणतेही शुभ काम सुरु करण्यास दिनशुद्धी बघण्याची गरज नसते. मुहूर्त ------ *श्रीगणराया घरी आणण्याचे मुहूर्त:-* *🙏🏻विनायक🙏🏻* *दि २४/०८/२०१७ रोजी गुरूवार भाद्रपद शुक्ल तृतीया आहे या दिवशी दुपारी ०२:०० वाजता बलवान हस्त नक्षत्र सुरू होत आहे तर आपण या शुभ मुहूर्तावर व नक्षत्रावर श्री गणपतींची मुर्ती आणावी.* *श्रीबाप्पा ला आणण्याचे मुहूर्त* ----------------------------------- *वेळ:- ०२ :०० ते ०३:३० दुपारी(अमृत)* *वेळ:- ०५:०० ते ०६:३० संध्याकाळी (शुभ)* *वेळ:- ०६:३० ते ०८:०० रात्री (अमृत)* या विशेष मुहूर्तावर श्रीगणरायास आपल्या घरी घेऊन यावे . स्थापना मुहूर्त माहिती -------------------------- *दि २५/०८/२०१७ रोजी शुकवारी श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ०८:२४ पासुन भद्रा(अशुभ) आहेत यामुळे आधीच वरील मुहूर्तावर आणावी आणि श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी.* *🌹विनायक🌹* गणपती का बसवतात? ---------------------------- आपल्या धर्म ग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषि यांनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणपती ला महाभारत लिहिण्याची विनंती केली. त्या वेळी गणपती ने होकार दिला. हे लिखाण दिवस रात्र चालेल आणि त्या मुळे गणपतीला थकवा येईल, अशा वेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपती ला मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपती ची यथा सांग पूजा केली. माती चे लेपन केले म्हणून गणपती अकडून गेला म्हणून याला पार्थिव गणेश असे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपती कड़े पाहिले असता त्याच्या शरीराचे तापमान खुप वाढले होते. हे तापमान कमी व्हावे आणि गणपती च्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपती ला पाण्यात शिरवले. या दहा दिवसात व्यासांनी गणपती ला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले. तेव्हा पासून गणपती बसवण्याची प्रथा पडली. या काळात गणपती ला आवडणारे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवतात. श्रीगणराया मुर्ती कशी असावी ------------------------------------ गणेशमूर्ती शाडू माती असावी. तसेच ती ९ ते ११ इंचच उंचीची असावी. त्याचप्रमाणे ही गणेशमूर्ती निवडताना सुद्धा अथर्वशीर्षांत वर्णिलेल्या गणेशासारखीच असावी. *|| एकदन्तं चतुर्हस्तम् पाशमं कुशधारिणम् ||* *रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् |* *रक्तम् लम्बोदरं शूर्पकर्णकं ||* म्हणजेच- एकदन्तम्- एक दात असलेला चतुर्हस्तम्- चार हात असलेला पाशमंकुश धारिणम्- पाश व अंकुश ही दोन शस्त्रे दोन हातांत धारण केलेला व उर्वरित हातात एकात तुटलेला दात तर दुसऱ्या हातने प्रसादमुद्रा करून भक्तांना वर प्रदान करणारा, मोठे सुपासारखे कान, लंबोदर, मूषकासहित अथवा मूषकावर स्वार असणारा, अशी गणेशमूर्ती असावी. *❤विनायक❤* श्री गणरायाची मूर्ती कशी आणावी ? ------------------------------------------- पुराणांत गणपती हा मळापासून बनला असल्याचे सांगितले आहे. चिकणमाती किंवा शाडूमाती यांपासून तयार केलेल्या गणेशाच्या मूर्तीमध्ये गणेशतत्त्व आकृष्ट होण्याचे प्रमाण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या तुलनेत खूप जास्त असते. तसेच गणेशमूर्ती ही शक्यतो पाटावर बसलेली व हातात पाश अंकुश धारण केलीली असावी. नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. त्यामुळे त्यातून अधिक प्रमाणात गणेशाची शक्ती कार्यरत होऊन पूजकाला अधिक लाभ होतो. घरच्या प्रमुख व्यक्तीने शकत्यो बिना चप्पल घालता गणेशमूर्ती आणावी. त्याकरिता घरातून निघतानांच एक तबक, गुलाल व नवीन मोठा रुमाल घेऊनच निघावे. त्यानंतर वरती वर्णिल्याप्रमाणे गणेशमूर्ती घ्यावी. गणेशमूर्ती आवडली की प्रथम त्या मूर्तीवर थोडासा गुलाल उधळावा व ‘मंगलमूर्ती मोरया’ असा गजर करीत, आणलेल्या तबकात मूर्ती घ्यावी व त्यावर रुमाल झाकावा व मुलाबाळांसहित अत्यंत आनंदाने ‘श्रीं’सह घरी यावे. घरी आल्यानंतर दरवाजातच थांबावे. घरच्या लक्ष्मीने अखंड पोळी त्या मूर्तीवरून ओवाळून बाहेर ठेवावी व श्रीगणरायाची सोन्याने देवाचे औक्षण करावी व पतीच्या, मुलांच्या कपाळाला गुलाल लावून ‘गणेशा आपले सहर्ष आगमन असो’, असे म्हणून टाळ्यांच्या कडकडाटात श्रींना घरात घ्यावे. ज्या जागी स्थापना करायची, त्या जागेवर थोडय़ाशा अक्षता ठेवून त्यावर गणेशमूर्ती ठेवावी. विशेष म्हणजे श्रीगणरायाच्या मुर्तीचे मोल हे अनमोल आहे जी मुर्ती आपणास आवडेल ती मुर्ती आपण घ्यावी देवाची मुर्तीची किंमत ( भाव) करू नये . *=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=**=*=*=*=* *तेवीस प्रकारचे मोदक:* *१. पनीरचे मोदक पनीरमध्ये साखर, काजू, किसमिस, वेलची पावडर भरून हे सारण रवा, मैद्याच्या पोळीमध्ये भरून तळून काढावे. हा मोदकाचा प्रकार मला दिल्लीला एका ठिकाणी खायला मिळाला. *२. खव्याचे मोदक हा प्रकार तसा सगळीकडे दिसतो. यामध्ये खव्यात साखर, केशर घालून, भाजून साच्यात घालून मोदक करतात. *३. बेक केलेले मोदक खोबरं, किसमिस, खव्याचे सारण मैद्याच्या सप्तपारीमध्ये भरून बेक करावे. *४. गूळ कोहळ्याचे मोदक हा प्रकार विदर्भातील आतल्या गावातला. गूळ, लाल कोहळा व तेवढीच कणिक घेऊन एकत्र मळावे. मोदकाचा आकार देऊन मंद आचेवर तळावे. *५. पुरणाचे मोदक पुरणाचे सारण मैद्याच्या पारीमध्ये भरून मोदक तळून घेतात किंवा वाफवूनसुद्धा घेतात. *६. फ्रुट मोदक वेगवेगळया प्रकारची फळे मिक्स फ्रुट जॅममध्ये मिसळून हे सारण मैद्याच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळून घ्यावे. *७. संदेश मोदक पनीर, खवा, साखर, केशर, वेलची एकत्र मिक्सरमध्ये वाटून याचे मोदक साच्यामध्ये बनवून वाफवून घ्यावे. विनायक V7 *८. मनुकांचे मोदक मनुका, काजू एकत्र करून त्यात थोडी दूध पावडर घालून त्याचे मोदक वळावे. *९. तीळगुळाचे मोदक गुळाचा पाक तयार करून त्यात भाजलेले तीळ घालावे व हे सारण कणकेच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळावे. किंवा तीळ व गुळाचे जे सारण आहे ते थोडे गरम असतानाच साचामध्ये घालून त्याचे मोदक करावे. हा प्रकार यवतमाळ भागात करतात व तिळी चतुर्थीला याचा नैवेद्य दाखवतात. *१०. खोबरं मैद्याचे मोदक हा मोदक प्रकार सर्व ठिकाणी आढळून येतो. रवा, खोबरं, खवा, साखर एकत्र करून हे सारण मैद्याच्या वाटीत भरून मंद आचेवर तळावेत. *११. मैद्याचे उकडीचे मोदक मैद्याची पारी लाटून मध्ये कुठलेही गोड सारण भरून त्याचे वेगळ्या आकाराचे मोदक करावे व वाफवून घ्यावे. थोडक्यात मोमोज म्हणजेच मोदकासारखा एक प्रकार. ते ज्याप्रकारे करतात तसाच हा प्रकार करावा. *१२. कॅरामलचे मोदक पनीर, खवा, काजू, किसमिस, साखर एकत्र करून त्याला मोदकाचा आकार द्यावा. हा मोदक साखरेच्या कॅरामलमध्ये बुडवून थंड करून सव्र्ह करावा. *१३. काजूचे मोदक काजू कतलीचे सारण घेऊन या मध्ये खवा, खडीसाखर भरून याला मोदकाचा आकार द्यावा. *१४. फुटाण्यांचे मोदक फुटाणे बारीक करून त्यात साखर व तूप घालून चांगले मळावे या पिठाला मोदकाचा आकार द्यावा. हा प्रकार गरम न करता चटकन होणारा प्रकार आहे. *१५. तांदळाचे गुलकंदी मोदक तांदळाच्या उकडीमध्ये गुलकंदाचे सारण भरून हे मोदक मंद आचेवर तळा किंवा वाफवून घ्या. *१६. पोह्यांचे मोदक पोहे चांगले भिजवून त्याचा गोळा मळावा. त्यामध्ये आपल्याला हवे ते सारण भरून मंद आचेवर तळावे. *१७. चॉकलेटचे मोदक खवा, खोबरं, दाणे बारीक करून मळून घ्या. त्यानंतर याला मोदकाचा आकार द्यावा. व एकेका मोदकाला हॉट चॉकलेट सॉसमध्ये बुडवून थंड करून सव्र्ह करा. *१८. शेंगदाण्यांचे मोदक गूळ आणि शेंगदाणे एकत्र करून त्यात काजू, किसमिस घालावे व उकडलेला बटाटा व साबुदाण्याच्या पिठाच्या पारीमध्ये भरून तळून घ्यावे. विनायक *१९. बटाटयांचे मोदक बटाट्यामध्ये खवा, साखर, काजू, किसमिस घालून त्याचा हलवा बनवावा व साच्यामध्ये घालून मोदक करावे. वरून दुधाची पावडर लावावी. *२०. पंचखाद्याचे मोदक पंचखाद्य एकत्र करून हे सारण मैद्याच्या पारीत भरून डीप फ्राय करा. *२१. बेसनाचे मोदक बेसनाच्या लाडवाच्या सारणाला साच्यात घालून मोदकाचा आकार द्यावा व मधे एक एक काजू भरावा. *२२. डिंकाचे मोदक डिंक तळून डिंकाच्या लाडवाचे मिश्रण करावे. हे मिश्रण कणकेच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळून घ्यावे. *२३. उकडीचे मोदक तांदळाची उकड तयार करून त्यात ओलं खोबरं व गूळ याचे सारण भरून मोदकाचा छान आकार देऊन वाफवावे. हा प्रकार कोकणात चाखायला मिळतो. विनायक V7 *=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=**=*=*=*=* || जय गणेश || || ॐ गं गणपतेय नमः || || ॐ श्रीं चिंतामणी प्रसन्न || सर्वांचे मनापासून खुपखुप धन्यवाद !!! 🙏 व येणाऱ्या गणेशोत्सवाच्या खुप खुप शुभेच्छा !!!
48 likes
39 shares