Back to feed
M
Myra Yadav Life · Marathi · Life

*"श्रद्धा माणसाला गायीचे मूत्र प्यायला आणि शेण खायला प्रवृत्त करू शकते", हा शोध भारत सोडून इतर कोणत्या देशात लागला आहे का?* म्हणून तर आपल्या देशात वैज्ञानिकांची नाही तर *बुआ, बापू, अम्मा, टम्मा, योगी, साध्वी, महाराज, महंत, फादर, उलेमा, सुलेमा* यांची राजरोस पैदास सुरु आहे.इथे दगडातुन "फक्त स्त्रियांसाठी घातक" किरणे उत्सर्जित होतात म्हणे..!! (नशीब अजुन नासा ची एखादी टीम त्याचे परिक्षण करायला आली नाही!!) अस्पृश्यता, हिंदू-मुस्लीम, अन्याय अत्याचार, गौमाता, भारतमाता, शनिमंदिर, देशद्रोही, फतवे, स्त्रियांनी किती केस वाढवायचे, कुणी कोणते कपडे घालायचे, काय खायचे यातच मेंदू कित्ती खर्ची होतो माहिती आहे...? मग आमच्या शिणलेल्या पिचलेल्या मेंदूतून कसले शोध लागणार? हेच,शास्त्रशुद्ध कसे बोंबलायचे, किती बोंबलायचे..वेदकाळात विमाने कशी चालत असत..गाईचे शेण किरणोत्सार रोधक असते.. वगैरे वगैरे..कुंडलिनी, ज्योतिष, वास्तुशास्त्र, गर्भसंस्कार यापासून ते अनेक अंधश्रद्धापर्यंत, अनेक पोकळ दाव्यांपर्यंत आपल्या डोक्यात फक्त जुन्यापान्या गोष्टीं "भरले आहे.. आम्ही हजारो वर्षे फक्त लोकांना उल्लूच बनवत आलो आहोत, आणि आताही एकमेकांना उल्लूच् बनवत जगत आहोत📝 दगडाला दगड मारून माणसाने अग्नी शोधून काढला. ( त्या वेळेस माणूस जंगली अवस्थेत होता.) तो अन्न शिजवून खायला लागला हि झाली प्रगत अवस्था..हे शक्य झाले अग्नी चा शोधामुळे व अग्नी शोधला गेला शोधबुध्दी मुळे व त्यानंतर आज अनेक शोध लागून आपण आधुनिक युगात आहोत.. निसर्ग व आपली विवेकबुध्दी हेच आपल शक्तीस्थान आहे..आपल्याला जंगली अवस्थेत परत जायचे आहे की evolution घडवायच? हे प्रत्येकाने स्वबुध्दीवर ठरवायच आहे.✏ *जगाला घडवण्या अगोदर स्वताला घडवूया,* *जग चाले पुढे पुढे आपण गिरवतो जुने धडे !* *आता आमच्या धडावर : आमचे डोके असेल.* *परिवर्तनवादी युवा घडवूया चला जगण्याची दिशा बदलूया* !!!

237 likes 18 shares
WhatsApp