⛳⛳⛳ *शिवाजंली*⛳⛳⛳ *शांत झाला वादळवारा समुद्रही तो थांबला!* *डोळ्यांत आसवे घेऊन रायगडही तो निजला!* *श्वास अखेरचा त्या वीर धुरंधराचा!* *आक्रोशली धरणी शोक रायगडाचा!* *शिवगर्जना थांबली नाही प्रकाश सूर्याचा!* *सिंहासन पोरके झाले राजा आमचा गेला.* *डोळ्यांत आसवे घेऊन रायगड तो निजला!* *तलवार म्यान झाली महाराष्ट्र धन्याची!* *शिवतेज मिटले गंगा अवतरली अश्रूंची!* *समाधी लागली घटना तीन एप्रिलची!* *कामधेनूचाही पान्हा आज कसा आटला.* *डोळ्यांत आसवे घेऊन रायगड तो निजला!* *छत्र हरपले रयतेचे कोण आता उरले.* *हे शिवराया लाख प्रजेचे हृदय आज चिरले!* *शिवाजंली तुला लेखणीची गीत मला स्फुरले!* *लाख अश्रूंचा अभिषेक होता, तुझ्या शवाला डोळ्यांत आसवे घेऊन रायगड तो निजला!* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🚩🚩🚩🚩🚩🚩⛳⛳⛳⛳ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 *३एप्रिल १६८० छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन झाले. तो शिवस्मृतीदिन म्हणून हे काव्य शिवरायांना समर्पित करुन अभिवादन करतो..* 🙏 *जय शिवराय* 🙏
N
Nisha Mishra
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
195 likes
15 shares