Back to feed
N
Nikhil Verma Shivaji · Marathi · Shivaji_Pride

शिवरायांचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा प्रताप। शिवरायांचा आठवावा साक्षेप भुमंडळी ।॥१॥ शिवरायांचे कैसे बोलणे । शिवरायांचे कैसे चालणे। शिवरायांची सलगी देणे कैसी असे।॥२॥ सकल सुखांचा केला त्याग । म्हणोनी साधिजे तो योग । राज्य साधनाची लगबग कैसी केली ।॥३॥ याहुनी करावे विशेष । तरीच म्हणवावे पुरूष । या उपरी आता विशेष । काय लिहावे ।॥४॥ शिवरायांसी आठवावे । जीवित तृणवत मानावे । इहलोकी परलोकी उरावे। किर्तिरुपे॥५॥ निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥६॥ - श्री समर्थ रामदास स्वामी

230 likes 15 shares
WhatsApp