R
Rudra Singh
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ।।१।। शिवरायांचे कैसें बोलणें । शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायांची सलगी देणे । कैसी असे ।।२।। सकल सुखांचा केला त्याग । म्हणोनि साधिजें तो योग । राज्यसाधनाची लगबग । कैसीं केली ।।३।। याहुनी करावें विशेष । तरीच म्हणवावें पुरुष । या उपरीं आता विशेष । काय लिहावे ।।४।। शिवरायांसी आठवावें । जीवित तृणवत् मानावें । इहलोकी परलोकीं उरावे । कीर्तीरूपें ।।५।। निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।६।।
82 likes
70 shares