स्कॅटसॅट-1 :- ----------------------------------- * भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) पीएसएलव्ही सी-३५ या प्रक्षेपकाच्या मदतीने स्कॅटसॅट-१ या हवामान उपग्रहासह आठ उपग्रह अवकाशात सोडले * मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘प्रथम’ या उपग्रहासह अन्य देशांच्या पाच उपग्रहांचा त्यात समावेश आहे. पीएसएलव्ही सी-३५ हे ४४.४ मीटर उंचीचे अवकाशयान सतीश धवन अंतराळ केंद्रातून अवकाशात झेपावले. * स्कॅटसॅट १ हा ३७१ किलो वजनाचा उपग्रह आहे.सोडलेल्या आठही उपग्रहांचे एकूण वजन सुमारे ६७५ किलोग्रॅम आहे. * स्कॅटसॅट-१ची उपयुक्तता :- * भारताचा स्कॅटसॅट उपग्रह हवामान आणि समुद्रात होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवेल. तसेच त्याच्याशी संबंधित महत्त्वाची माहिती देईल. या उपग्रहाद्वारे हवामानाचा अंदाज आणि चक्री वादळांची माहिती मिळणार आहे. या उपग्रहाचे आयुर्मान पाच वर्षे आहे. * वैशिष्टय़े.:- * मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रथम या उपग्रहाचे श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. सप्तर्षी बंडोपाध्याय आणि शशांक तामसकर या दोन विद्यार्थ्यांनी 2007मध्ये "प्रथम‘ या उपग्रहाची संकल्पना मांडली. यानंतर 2009मध्ये आयआयटी मुंबई आणि इस्रोमध्ये सामंजस्य करार झाला होता * .बंगळूरच्या पीईएस विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेला "पीआयसॅट‘ हा 5.25 किलोग्रॅम वजनाचा उपग्रह पृथ्वीची छायाचित्रे घेणार असून, तो रिमोट सेंसिंगसाठी तयार करण्यात आला आहे. * प्रथमचा उद्देश ‘टोटल इलेक्ट्रॉन काऊंट’ हा असून, ‘पीसॅट’ हा दूरसंवेदन प्रकारातील नॅनो उपग्रह आहे. * अलसॅट १ एन हा विद्यार्थ्यांनी तयार केलेला तंत्रज्ञान उपग्रह आहे. * पाथफाइंडर १ हा अमेरिकेचा अधिक विवर्तन शक्ती असलेला उपग्रह आहे. * कॅनडाचा एनएलएस १९ हा तंत्रज्ञान उपग्रह अवकाशातील कचरा कमी करण्यासाठी व व्यावसायिक विमानांवर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा वापर होणार आहे. * हे उपग्रह झेपावले.. ‘स्कॅटसॅट-१’ (भारताचा हवामान उपग्रह – ३७१ किलो), ‘प्रथम’ (मुंबई आयआयटी विद्यार्थ्यांनी घडवलेला उपग्रह – १० किलो), ‘पीसॅट’ (बंगळुरू येथील बीएसई विद्यापीठ – ५.२५ किलो), ‘अलसॅट-१ बी’, ‘अलसॅट-२ बी’, ‘अलसॅट-१ एन’ (अल्जेरिया), ‘पाथफाइंडर-१’ (अमेरिका), ‘एनएलएस-१९’ (कॅनडा)
210 likes
69 shares