सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥ सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥ रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥ हिरेजडीत मुकुुट शोभतो बरा । रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥ माथा मुकुट मणी कानी कुंडले । सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।। नागबंद सोंड-दोंद मिराविले । विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥ चतुर्भुज गणराज बाही बाहुटे । खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।। सुवर्णाचे ताटी शर्करा घृत । अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥ छत्रे चामरे तुजला मिरविती । उंदीराचे वाहन तुजला गणपती ।। ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी । आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥ ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती । ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।। ताल मृदंग वीणा घोर उमटती । त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥ लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥ दास रामाचा वाट पाहे सदना । संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना ॥ जय ० ॥ ७ ॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥ घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रुप तुझें । प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन, भावें ओवाळीन म्हणे नामा ।।१।। त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव । त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव ।।२।। कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा, बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात । करोमि यध्य्त सकलं परस्मे, नारायणायेति समर्पयामि ।।३।। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम। श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्र भजे ।।४।। हरे राम हर राम, राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे !!गणपती बाप्पा मोरया!! —
19 likes
60 shares