Back to feed
V
Vihaan Iyer Friendship · Marathi · Friendship

*सात कोड्यांना आई ने आपल्या मुलांना दिलेली उत्तरे* *१. या जगात सगळ्यात टोकदार वस्तू कोणती..??* *मुले म्हणाली , तलवार...* *आईने सांगितले.. जीभ..* कारण या जिभेमुळे माणूस सहजपणे दुसर्याचा अपमान करतो, दुसर्याला दुखावतो, दुसर्याच्या भावनांना धक्का पोचवतो. 💝💝 *२. या जगात आपल्यापासून सगळ्यात दूर काय आहे..??* *एकजण म्हणाला, सूर्य, चंद्र, आकाशगंगा...* *आई म्हणाली... भूतकाळ.* माणूस कितीही श्रीमंत असला तरी तो भूतकाळात जाऊ शकत नाही.त्यामुळे आपण आजच्या दिवसाचा आणि आपल्या आयुष्यात येणार्या पुढील सगळ्या दिवसांचा चांगला उपयोग केला पाहिजे. 💝💝 *३. या जगातील सगळयात मोठी गोष्ट कोणती..???* *दुसर्याने सांगितले की, पृथ्वी, पर्वत, सूर्य.* आई म्हणाली, जगातील सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे..अपेक्षा. लोक दुःखी होतात त्यामागील कारण त्यांच्या मनातील न संपणारी अपेक्षा. ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांची कुठल्याही थराला जाण्याची तयारी असते. त्यामुळे अपेक्षा करताना काळजी घ्या. 💝💝 *४. पृथ्वीवर सगळ्यात वजनदार वस्तू कोणती...???* *तिसर्या ने उत्तर दिलं... पोलाद, लोखंड, हत्ती.* आई म्हणाली, सगळ्यात कठिण वस्तू... वचन. *वचन देणे सोपे असते पण ते पाळणे कठिण.* 💝💝 *५. पृथ्वीवरील सगळ्यात हलकी वस्तू कोणती..??* *चौथा म्हणाला .. कापूस, हवा, धूळ, पाने.* *आई म्हणाली, सगळीकडे मी आणि मीपणा हलका असतो.* पैसा, पद आणि प्रतिष्ठेच्या मागे धावणार्यांकडे पहा. काही जणांनाच हा मीपणा सोडता येतो. 💝💝 *६. पृथ्वीवरील माणसाच्या सगळ्यात जवळची गोष्ट कोणती..???* *पाचव्याने सांगितले, आई, वडिल, मित्र, नातेवाईक.* आई म्हणाली, माणसाच्या सगळ्यात जवळची गोष्ट म्हणजे "मृत्यू". *कारण कुठल्याही सेकंदाला मृत्यू येण्याची शक्यता असते.* 💝💝 *७. शेवटचा प्रश्न..* *या जगात करता येण्यासारखी सगळ्यात सोपी गोष्ट कोणती...??* *मुले म्हणाली खाणे, झोपणे, फिरायला जाणे.* *आईने नम्रतेने सांगितले सगळ्यात सोपी गोष्ट आहे, आपल्याकडे असलेले ज्ञान इतरांना देणे.*

15 likes 89 shares
WhatsApp