*स्त्री यंत्र नाही हो .............!* स्त्री यंत्र नाही हो ,ती ही माणुस आहे . तीला ही मन आहे ,ह्रदय आहे. तीला ही भावना आहेत . ती ला ही हसावेसे वाटते . चारचौघांमध्ये मिसळावेसे वाटते . आपल्या विचारांना प्रकट करावेसे वाटते . काम करून ती ही थकते . ती ला ही आरामाची गरज असते . असे म्हणतात की या जगात कोणीही परिपुर्ण नाही ,मग एका स्त्री कडून ती परिपुर्ण होण्याची अपेक्षा का केली जाते . प्रत्येक वेळी तीच्या चुकांचा उहापोह का केला जातो ? का वारंवार केलेल्या चुकांच्या उहापोहामुळे तीच्यात न्युनगंड तर निर्माण होत नाही ना? कधी आळशी तर अकार्यक्षमतेची लेबल्स चढविली जातात . केवळ पोटाला जेवण ,अंगाला कपडा व चैनीला वस्तु एवढ्याच तीच्या गरजा असतात का? नाही , खरी गरज असते ती भावनिक आधाराची ,तीला समजुन घेणार्या आपल्या माणसाची ,तीला गरज असते प्रेमाची ,मायेची . तुमचा एक कौतुकाचा शब्द तीला दहा हत्तींचे बळ देऊन जाते . "तु थकली असशील ,थोडा आराम कर "हे प्रेमळ शब्द तीला नवीन उत्साह देऊन जातात . तीला ही तीच्या आवडी निवडी असतात . तीला ही मित्र मैत्रिणी असताच ,त्याच्यात बसावं गप्पा गोष्टी कराव्यात असही तीला वाटते . कधी कधी स्वतःसाठी एक क्षण जगण्याची तीचीही इच्छा असते तीलाही कधी कधी एकांतात बसावेसे वाटते . भुतकाळातील आठवणींना उजाळा द्यावासा वाटतो . तीच्या आवडत्या व्यक्तीशी खुप गप्पा माराव्याशा वाटतात . पण म्हणुन काय ती स्वैराचारी होते ?का ती माणुस नाही ? तीला भावभावना नाहीत ? का तीच्या गरजा इतरांपैक्षा वेगळ्या असतात ? मित्रांनो ! तीला समजुन घ्या ,तीचे दुःख समजुन घ्या . तीच्याशी मनमोकळे पणाने बोला ,कारण हे आयुष्य खुप लहान आहे . व गेलेला व्यक्ती पुन्हा कधीच परत येत नाही .आणि मागे उरतात त्या फक्त आठवणी व डोळ्यात पश्चातापाचे पाणी !!!! खरंच खूप विचार करण्यासारखा लेख आहे.......🙏🏻🙏🏻🙏🏻 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
D
Diya Nair
Friendship · Marathi · Friendship
124 likes
52 shares