Back to feed
S
Sahil Patel Love · Marathi · Rain

सुंदर पडणारा पाऊस आणि तुझी आठवण येते एकाचवेळी पावसाच्या थेंबात चिंब होताना तुझ्या आठवणीने देखील मी चिंब होते. सोबत येणार गारवा आणि मातीचा ओला सुगंध आठवण करून देतो आपल्या जगलेल्या क्षणांची आठवत ते बेधुंदपणे पाऊसात भिजणं ..छत्री असताना देखील ती न उघडणं उगीच साचलेल्या पाण्यातून मी चालायचे अधिकाधिक चिंब होण्यासाठी आताशा हे पावसाचं बरसण.. हे रडणंच जास्त वाटत. कारण तो देखील मोकळा होत असतो साचलेलं सगळं उधळत असतो .. मी देखील साचलेय अशीच .. गेली कित्तेक दिवस.. पावसाला नाही लागत कुणाचा आधार… पण मी मात्र त्याचाच आधार घेते. डोळ्यावर चेहऱ्यावर त्याला बरसू देते .. खूप हलकं वाटत असं एकरूप झाल्यावर … ओसरतात मनाचे कढ.. मनातला पाऊस थांबल्यावर

0 likes 0 shares
WhatsApp