सुंदर मुलीशी ऒळख व्हावी, आम्हा दोघांची मने जुळावी । हातात हात घालून फ़िरणारी, मलाही girl friend मिळावी ॥ हास्याच्या पहिल्या किरणाने, प्रितीची खळी उमलावी । डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे, रूपाची ती राणी असावी ॥ अशीच माझी स्वप्नसुंदरी, ह्र्दयाच्या नगरात रुळावी । हातात हात घालून फ़िरणारी, मलाही girl friend मिळावी ॥ चौपाटीवर पाणीपूरीतून, प्रणयाचेच घास भरवू । रिक्षात मीटरला साक्षी मानून, प्रेमाच्याच शपथा घेऊ ॥ आयुष्यातील सारी दु:खं, जिच्या सहवासात टळावी । हातात हात घालून फ़िरणारी, मलाही girl friend मिळावी ॥ द्वीधा मनं मग मध्येचं म्हणत, आधी girl की आधी friend । आयुष्यभराचं नातं हवं, देव करो तीच्याकडूनचं, प्रेमाची ख्ररी व्याख्या कळावी । हातात हात घालून फ़िरणारी, मलाही girl friend मिळावी...!
101 likes
59 shares