Back to feed
A
Arjun Deshmukh Festival · Marathi · Festival

सोन्याच्या दरात मोठी घसरण मुंबई : दसरा सणाच्या निमित्त सोनेखरेदीचा विचार असेल तर लगेच घाई करा कारण सोन्याच्या दरात मोठी घसरण झालीये. नवी दिल्ली आणि मुंबईत सोन्याच्या दरात तब्बल 760 रुपयांची घसरण झालीये.  सोन्याचे दर प्रति तोळा 30 हजार 100 रुपयांपर्यंत खाली आलेत. तर चांदीच्या दरातही घसरण झालीये. चांदीचा दर प्रतिकिलो 43205 रुपयांपर्यंत खाली आलाय.  दसरा-दिवाळीच्या आधी ही घसरण झाल्याने खरेदीदारांचा उत्साह वाढेल अशी सराफ व्यापाऱ्यांना आशा आहे. यंदाच्या वर्षातील ही मोठी घसरण आहे.

102 likes 29 shares
WhatsApp