Back to feed
S
Shaurya Agarwal Patriotic · Marathi · Patriotic

स्पेशल रिपोर्टः अजित डोभाल... भारताचा चाणक्य नवी दिल्लीः ऑपरेशन म्यानमार आणि आता ऑपरेशन पीओके या भारताच्या मोहिमा यशस्वी करण्यामागे एक मास्टरमाईंड आहे. या मास्टरमाईंडला भारताचा चाणक्य ही उपमा दिली तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. अजित डोभाल असं या शत्रूच्या काळजाला धडकी भरवणाऱ्या व्यक्तिचं नाव आहे. डोभाल यांचं वय 70 वर्षे आहे, मात्र कामगिरी तरुणालाही लाजवणारी आहे. ऑपरेशन पीओकेनंतर भारताचा हा एक्का पुन्हा एकदा सिद्ध झाला. ऑपरेशन पीओकेआधी जून 2015 मध्ये ऑपरेशन म्यानमार हे एक असंच ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. अजित डोभाल हेच नाव या ऑपरेशनचं मास्टर माईंड होतं. म्यानमारच्या हद्दीत तब्बल 2 किलोमीटर आत घुसून 100 फुटीरतावाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. 4 जून 2015 ला मणिपूरच्या चंदेलमध्ये 18 जवानांच्या बलिदानाचा हा बदला होता. अजित डोभाल यांच्या या कामगिरीमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेवर आल्या-आल्या अजित डोभाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली. ऑपरेशन म्यानमार आणि ऑपरेशन पीओके यशस्वी करुन त्यांनी ही निवड सार्थ करुन दाखवली आहे. मात्र अजित डोभाल यांचा हा प्रवास कठिण होता. 1968 साली अजित डोभाल आयपीएस झाले. एकूण कारकिर्दीत त्यांनी अनेक वर्ष हेर म्हणूनच काम केलं. अजित डोभाल भारताची गुप्तचर संस्था रॉचे अंडर कव्हर एजंट होते. डोभाल 7 वर्ष लाहोरमध्ये पाकिस्तानी मुस्लिम बनून राहिले. पाकिस्तानमधील वास्तव्यात तिथल्या नसा-नसात असलेला दहशतवाद त्यांनी अगदी जवळून पाहिला. पीओके ऑपरेशनचं यश याच अनुभवांचं फलित होतं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. भारताला शौर्यशाली अधिकाऱ्यांचा इतिहास आहे, त्यात अजित डोभाल हे नाव जोडलं जाईल, यात शंका नाही. मात्र दुश्मनांचा कर्दनकाळ असणाऱ्या डोभाल यांच्या हातून आणखी एक काम होणं बाकी आहे. भारताचा गुन्हेगार दाऊद इब्राहिम अद्याप मोकाट आहे. त्याला जेरबंद करण्याचं आव्हान अजित डोभाल यांच्यासमोर आहे.

139 likes 26 shares
WhatsApp