Back to feed
I
Ira Rao Patriotic · Marathi · Patriotic

सब घोडे बारा टक्के ! ! ! जितकी डोकी, तितकी मते, जितकी शिते, तितकी भुते | कोणी मवाळ, कोणी जहाल, कोणी सफेद, कोणी लाल । कोणी लठ्ठ, कोणी मठ्ठ, कोणी ढिले, कोणी घट्ट । कोणी कच्चे, कोणी पक्के, सब घोडे बारा टक्के | गोड गोड जुन्या थापा, जुन्या आशा नवा चंग, जुनी स्वप्ने, नवा भंग। तुम्ही तरी करणार काय, आम्ही तरी करणार काय | त्याच त्याच खड्डयां मध्ये, पुन्हा पुन्हा तोच पाय | जुनाच माल नवे शिक्के, सब घोडे बारा टक्के । जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे टक्के तिकडे टोळी । “ज्याचा पैसा त्याची सत्ता” पुन्हा पुन्हा हाच कित्ता । पुन्हा पुन्हा जुनाच स्वार, मंद घोडा अंध स्वार । यांच्या लाथा त्यांचे बुक्के, सब घोडे बारा टक्के । सब घोडे ! चंदी कमी, कोण देईल त्याची हमी ? डोक्यावरती छप्पर तरी, कोण देईल माझा हरी । कोणी तरी “देईन” म्हणा, मीच फसविन माझ्या मना । भुकेपेक्षा भ्रम बरा, कोण खोटा कोण खरा। कोणी ति-र्या, कोणी छक्के, सब घोडे बारा टक्के । -- विंदा करंदीकर - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - आपल्या देशात १९५० साली पहिल्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या. नंतर दोनच वर्षांनी म्हणजे १९५२ साली विंदा करंदीकरांनी ही कविता लिहिली आहे. त्यातील सत्यतेचा प्रत्यय आज ही येतो आहे.

82 likes 24 shares
WhatsApp