Back to feed
A
Anika Malhotra Friendship · Marathi · Friendship

सोलापूरला २० डॉक्टरांनी एकत्र येऊन सुरू केलीय झाडांची भिशी सोलापूर -एरवी मानवी आरोग्याची काळजी घेणारे शहरातील २० नामवंत डाॅक्टर निसर्ग संवर्धनासाठी पुढे सरसावले आहेत. झाडांची भिशी ही अभिनव संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. स्वत:च्या खिशातून महिन्याकाठी प्रत्येकी २०० रुपये जमा केले जातात. एकत्र झालेल्या हजार रुपयांसाठी रीतसर चिठ्ठी उघडली जाते. ज्या डॉक्टरांच्या नावाने चिठ्ठी लागेल त्यांच्या परिसरात २० रोपटी आणि लोखंडी जाळी लावण्याची तजवीज केली जाते. येत्या वर्षभरात घनदाट सावली देणारी रोपटी लावण्याचा हा वेगळा प्रयोग ही मंडळी करत आहे. हे आहेत निसर्गदूत डॉ.नितीन बलदवा, यशवंत पेठकर, डॉ. प्रवीण सरवदे, डॉ. अंजनी पुराणिक, डॉ. आसिफ शेेख, डॉ. संतोष कराडगे, डॉ. शर्वरी आयाचित, डॉ. रूपा सरवदे, डॉ. महेश शिंदे, डॉ. श्रीनिवास संगा, डॉ. चंदन रव्वा, डाॅ. सुरभी देशमुख आणि इतर सदस्यांचा यात समावेश आहे. अशी सुचली संकल्पना डॉ. सचिन पुराणिक आणि डॉ. यशवंत पेठकर हे मागील दोन वर्षांपासून स्व:खर्चाने अनेक शाळा आणि कॉलनी परिसरात जाऊन रोपटी लावण्याचे काम करत आहेत. त्यांच्या या प्रयोगाचे इतर डॉक्टर मंडळींनीही स्वागत केले आणि त्यांच्या या उपक्रमात आपल्याला सहभागी होण्यास आवडेल असे संागितले. त्यातून २० जणांची चमू जमला. अाणि गेल्या महिन्यापासून झाडांच्या भिशीची सुरुवात झाली. ही मंडळी एकमेकांना वारंवार भेटून कोणते वृक्ष लावावे, त्यांचे संवर्धन कसे करावे याबाबत चर्चा होते. इथे केले आहे संवर्धन काडादी नगर, स्वत:ची सोसायटी आणि कॉलनी, तसेच ऑर्किड स्कूल, केएलई शाळा, उमा नगरी, लक्ष्मीविष्णू चाळ सोसायटी, जुळे सोलापूर इथे वृक्षारोपण केले आहे. एकट्या दुकट्याने कामकरणे आणि तेही निसर्ग संवर्धनाचे तसे थोडेसे अवघड आहे. एक जगवणेदेखील कष्टाचे काम आहे. आम्ही रोपटी लावून त्यांच्या संवर्धनाचेही काम करत आहोत. त्याने आम्हाला जो आनंद मिळतोय तो शब्दांत व्यक्त करत येणार नाही. मित्र यशवंत पेठकर यांची मदत सुरुवातीपासूनच होती ती आता इतर सहकारी मित्रांमुळे वाढली आहे."" डाॅ.सचिन पुराणिक

225 likes 33 shares
WhatsApp