सलीम खान यांनी सलमानला घरात कोंडून ठेवावं: शिवसेना कोल्हापूर: सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांना सहनुभूती दाखवल्याबद्दल त्याच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सलमानला पाकिस्तानात जावं, असा सल्ला दिल्यानंतर, शिवसेनेनेही सलमानवर टीकेची झोड उठवली आहे. सलीम खान यांनी आपल्या मुलाला घरात कोंडावं तो काहीही बोलत असतो, असा हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत यांनी चढवला आहे. सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांबद्दल सहनुभूती दाखवताना, ते कलाकार आहेत, दहशतवादी नव्हेत. सरकार त्यांना परवानगी आणि व्हिसा देते. भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये मारले गेलेले दहशतवादी होते. हे कलाकार आहेत, सरकार कलाकारांना वर्क परमीट देते, अशी प्रतिक्रीया दिली होती.
62 likes
23 shares