Back to feed
A
Asha Patel Patriotic · Marathi · Patriotic

सलमानवर राज ठाकरे पुन्हा संतापलेत मुंबई : अभिनेता सलमान खान याने पाकिस्तान कलाकारांची तळी उचलून धरल्याने नेटिझन आणि राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा सलमानला खडेबोल सुनावले आहेत. त्याला जर एवढे वाढत असेल तर त्याने पाकिस्तानात जाऊन शुटिंग करावे, असा सल्ला राज यांनी दिला.  दरम्यान, सलमान खान प्रकरणी शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सलीम खान यांनी आपला मुलगा सलमान खानला घरात कोंडून ठेवले पाहिजे, अशी बोचरी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. राज म्हणालेत, सलमानला जर पाकिस्तानी कलाकारांबद्दल इतकं प्रेम वाटत असेल तर त्याने तिथलं वर्क परमिट काढावे आणि पाकिस्तानात जाऊन तिथेच काम करावे. इथे आपले जवान शहीद होत आहेत आणि या लोकांना गाणी शूट करायची आहेत का, अशा शब्दांत राज ठाकरेंनी सलमानवर पुन्हा निशाणा साधला. कलाकार काय आभाळातून पडतात का, कलाकारांना स्वत:च्या देशासाठी उभे राहता येत नाही, त्या कलाकारांना पाकिस्तानात तरी किंमत तरी मिळते का, पाकिस्तानची लोक चांगली असतात तर मग चाटायचे का? असा सवालही राज यांनी विचारला. या लोकांनी कधी शहीदांना श्रद्धांजली वाहीली आहे का, यांचा पुळका कशाल, असे राज म्हणालेत.

120 likes 6 shares
WhatsApp