*सावित्री...* निघालो होतो घरून सगळ्यांचा निरोप घेऊन येऊ लवकर परत बाप्पा ला घेऊन... एकेक स्टेशन मागे टाकत गाडी निघाली होती खिड़कीतून पाऊस बघत मधेच डुलकी लागत होती... मधेच एकदा कॉल करून घरच्यांची आठवण झाली होती पोचलो की फोन करतो अशी बातचीत झाली होती... बायको नी सुद्धा फक्त अहो म्हटल होत चिमरुडी नी बाबा अस म्हटल होत हेच ते शब्द शेवटचे, फक्त कानात घूमत होते... त्याच क्षणी कळले ही नाही सर्व काही संपले होते... नाही कुणाचा आवाज नाही कोण बोलल होत दार खिडक्या बंद आतच रात्रभर घुसमटत होतो... आता मात्र सगळ संपलय शोध आमचा सुरु आहे सर्व यंत्रणा प्राण पणास लावत आहे... नातेवाईक सुद्धा प्रतिक्षेत आहेत शेवटचे दर्शन घ्यायला...रडत आहेत नेते मंडळी येऊन सुद्धा आपापली बाईट देत आहेत... करू आता ऑडिट सारे जेवढे ब्रिटिश पुल वाचले आहेत... गेला ना आता आमचा जीव काय परत मिळणार आहे शरीर मिळेल तेव्हा मात्र त्यात देह नसणार आहे... *भावपूर्ण* *श्रद्धांजली*
0 likes
0 shares