स्वत:साठी...कधीतरी... असंच कधीतरी स्वत:ला साजरं करता आलं पाहिजे. रटाळ आयुष्यालाही छान रमवता आलं पाहिजे. दुसऱ्यासाठी खपता खपता स्वत:ला सजवता आलं पाहिजे. जमलं नाही तरी हे मनावर मात्र घ्यायला पाहिजे. चिंता-क्रोध सोडून सगळा खरंच जगता आलं पाहिजे. अपुऱ्या साऱ्या इच्छा आपल्या पुऱ्या करता आल्या पाहिजे. पाऊस नाही पडला तरी चिंब भिजता आलं पाहिजे. विचारांच्या झुल्यावर धम्माल झुलता आलं पाहिजे. भूतकाळ विसरून आता सारा वर्तमान जगला पाहिजे. क्षणाचा व्यापार हा त्याच क्षणात संपवला पाहिजे..
107 likes
45 shares