*स्वामी* वाट चुकलोय थोडी वाट दाखवाना वादळात हरवलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवाना ! *स्वामी* अंधार खूप आहे थोडा प्रकाश दाखवाना दुःखाच्या पिंजऱ्यात कैद मनाला मोकळं आकाश दाखवाना ! *स्वामी* रण खूप मोठं आहे थोडा धीर द्या ना ! जगण्याच्या युद्धात सर्वाना हरवेल, असा एक तीर द्या ना ! *स्वामी* तहान खूप लागलीये थोडं नाव घेण्याची शक्ती द्या ना जीव जाताना हि तुमचंच नाव आठवावं इतकी भक्ती द्या ना ! *स्वामी* मी मागत राहीन तुम्ही देत राहाल पण शेवटचं वचन द्या ना ! तुम्ही कधीही सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच नाही काढणार हा *डोक्यावरचा हात*! !! *स्वामी ॐ* !! *श्रीस्वामीसमर्थ*
257 likes
66 shares