Back to feed
N
Nisha Iyer Love · Marathi · Missing

हृदय असे का धडधडते ? पुन्हा पुन्हा मी सावरते ! मनात सारे खेळ चालती उगा पापणी फडफडते ! तू सामोरी दिसल्यावर, मी लज्जेने बावरते ! पुसट तुझ्या रे स्पर्शाने , हर्षाने ही सळसळते ! कधीच नव्हता तू माझा , कुठे मनाला हे कळते ! आठवणींच्या पारावर, जुनी वेदना हळहळते !

0 likes 0 shares
WhatsApp