ह्या देशांत संपामुळे चार चार दिवस बँका बंद राहीलेल्या चालतात! एखाद्या अतिरिक्त कराला विरोध म्हणून भाजी मार्केट, दुकानं बंद ठेवलेली चालतात! आठ आठ दिवस पाणी नाही आलं तरी चालतं आणि जे काही पाणी उपलब्ध आहे ते घ्यायला एक एक किलोमीटर रांगा लावलेल्या चालतात!! पेट्रोल पंप, गॅस च्या एजन्सीज नी संप केल्यावर झालेली हेळसांड झालेली चालते! एखाद्या नेत्याला भ्रष्टाचार केला म्हणून अटक केली तर त्याला विरोध म्हणून राज्याच दैनंदिन काम बंद केलेलं चालते! एखाद्या कलाकाराला राजकीय विरोध म्हणून सगळी चित्रपट गृह बंद केलेली चालतात! अहो!! आठ आठ तास वीज गेलेली चालते! भ्रष्टाचाराने देश विकायला काढलेला चालतो!! टोलच्या रांगेत आपण तास तास थांबतो! महिने महिने सराफांची दुकानं बंद होती तेव्हा लग्न सराई थांबली नाही! रेशनची दुकांनं बंद ठेवली तरी अडचण नाही आली! ह्या सगळ्या संपांमुळे, बंद मुळे जीवनावश्यक वस्तू मिळणं मुश्किल झालं! त्याचे भाव गगनाला भिडले तरी आपल्याला अडचण नाही आली!! मात्र मोदींनी काळा पैसा बाहेर यावा, बाजारातून खोटे चलन बाद व्हावं, ज्यामुळे वास्तविक भविष्यात महागाई कमीच होणार आहे असा क्रांतिकारक निर्णय घेतला, आणि त्यामुळे होणार्या अपरिहार्य तात्पुरत्या अडचणी अत्यंत भयानक आणि आपल्याला यापुर्वी कधीच आल्या नाहीत असं अचानक वाटायला लागलं!!! एव्हढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात तेरा लाख कोटी रुपयांचे चलन बॅंकांत दोन दिवसांत पोचवणे ही काय सोपी गोष्ट नाही!! पण अचानक आपली लग्नसराई थांबली, अचानक रांगेत थांबल्याचा आपल्याला त्रास व्हायला लागला! अरे बापरे!! किती भयानक निर्णय घेतला ह्या मोदीने!!! आपला देश जणू बंदच पडला अशी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न व्हायला लागला! मानलं पाहीजे ह्या मिडिया आणि विरोधी पक्षांना!! कुठल्या गोष्टीचा स्वत:च्या स्वार्थासाठी फायदा घेतील कुणास ठाऊक! जय हिंद जय महाराष्ट्र .. खरोखर आपण असा दर्जेदार पंतप्रधान डिझर्व करत नाही... आपल्याला तसे "मूक-बधीर" पंतप्रधानच पाहिजेत..आपली तीच लायकी आहे ...कोणी सोबत असो नसो मी या युध्दात तुमच्या सोबत खारीचा वाटा उचलेन ..मला गर्व आहे की देशाच शासन एका योग्य व्यक्तिच्या हातात आहे 🙏🙏🙏🙏 मी एक सामन्य माणूस आहे.. मला चलनातील बदलाचा कुठलाही त्रास होत नसून, कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी माझी काळजी करू नये.. आणि झालीच काही अडचण तर ती माझ्या पातळीवर सोडवण्यास मी समर्थ आहे...
228 likes
66 shares