K
Kunal Mishra
Friendship · Marathi · Friendship
ह्या भूमिला बळ देणा-या तमाम नारीशक्तीला समर्पित शक्ती तू दुर्गा, तू सरस्वती जगत्जननी तू पार्वती संघमित्रा, गार्गी, मैत्रेयी तू अनुसया सती वीरमाता तू जिजाऊ शिवबाची स्फूर्ती झांसीची मर्दानी, सावित्री तू ज्ञानज्योती तू मीरेची निर्व्याज भक्ती ज्ञानेशाची गे तूच मुक्ती तू जनाईची भावगाणी बहिणाईची लोकवाणी जाहली प्रेरणा तू रमाई महामानवाची तू इंदिरा तू कल्पना ,प्रतिभा भारताची तूच आशा अन् लता सप्तसुरांची संहिता तू वहिदा, स्मिता, रेखा माधुरी रूपगर्विता तू सायना, तू सानिया, मेरीकाँम बलशालिनी तू सिंधु सेवाव्रती मंदा तू साधना आनंदवनी
19 likes
29 shares