हवीय मज माझी मला शाळा हवय मज माझ मला बालपण मी.. आहे कोठे ते चार सोबती शाळेतले आता जणु एकटा पडलोय वाटे मी... गृहपाठाची असे अजुन आठवण आणि गृहपाठ न केल्यास असे कोंबडा मी .. पुन्हा गिरकी मज् घेवु वाटे पृथ्वी भोवती पुन्हा शतपावलीचा खेळ अंकगणितावर मी.. खेळायचे न्यूटन सोबत आज चार खेळ आणि पायथागोरस सोबत मैञीचा मेळ.. पोहताना ही दिसे रेणुसुत्र आज आणि फळा पाहताना गुरुजींच्या शिक्षणाच भान.. खो खो कबड्डीचे नसे आता दिस आयुष्याच्या खेळात गुदमरले माझे हे जग.. गुरुजी विचारे मोठे झाल्यावर काय बनायचे पण उत्तर आता कळे मज् तर पुन्हा लहान बनायचे ..
19 likes
61 shares