Back to feed
A
Arjun Singh Life · Marathi · Life

|| ३३ कोटी देव || सध्या एक फार मोठा गैरसमज आहे, तो म्हणजे देवांची संख्या ३३ कोटी देव आहेत.. खूपशी हिंदुद्रोही मंडळी वाद घालताना एकप्रश्न हमखास विचारतात, की "तुमच्या हिंदूधर्मात म्हणे ३३ कोटी देव आहेत, त्यांची नावे तरी माहिती आहेत का तुम्हाला?" आणि आमचे श्रद्धावान हिंदू बांधव या प्रश्नासमोर गडबडूनजातात. हिंदू धर्म ग्रंथात "३३ कोटी" म्हणजेच "कोटी" या शब्दाचा मूळ अर्थ "३३ प्रकार" असा अर्थ अपेक्षित आहे... मुळात हिंदू धर्म हा जगातील एकमेव प्राचिन असा धर्म आहे. यात एकही गोष्ट "उगीचच" या सदराखाली येत नाही. तरीही जर तसे वाटले, तर निश्चितच समजावे की आपले ज्ञान कुठेतरी कमी पडतेय. ३३ कोटी या शब्दाचा जो सरळ-सरळ ३३ करोड असा अर्थ लावला जातो, तो चुकीचा आहे, खरे तर येथे कोटी या शब्दाचा अर्थ Degree किंवा सोप्या भाषेत सांगायचे तर "प्रकार" असा अर्थ होतो. कोटी ज्यावेळी आपण पैशासंदर्भात वापरतो तेथेही हाच अर्थ मुळात अभिप्रेत असतो हे खोलवर विचार केल्यास कळते. साधारणतः आपण व्यवहारात एखाद्या बुद्धीवंताबद्दल म्हणतो कि अमुक एक व्यक्ती अतिशय उच्चकोटीचे विचारवंत आहेत मग आपण ईथे त्यांच्या बौद्धिक वैचारिकतेचा अर्थ एखाद्या विशिष्ट संख्येमध्ये कसे काय मोजणार.????? असो महत्वाचे म्हणजे हिँदू धर्म ग्रंथात ३३ कोटी म्हणजेच ३३ प्रकारचे हा उल्लेख येतो आणि तोच ईथे अपेक्षित आणि महत्वाचा आहे.. आता प्रश्न असा येईल की हे ३३ कोटी, म्हणजे ३३प्रकारचे देव नेमके कोण कोणते आहेत.? तर त्यांची नावे वाचा लक्षात राहत नसतील तर लिहून घ्या!! *१२ आदित्य १) धाता, २) मित्र, ३) अर्यमा, ४) शक्र, ५) वरुण, ६) अंश, ७) भग, ८) विवस्वान, ९) पूषा, १०) सविता, ११) त्वष्टा आणि १२) विष्णू.. (संद र्भ:महाभारत, आदि. ६५/१५-१६) * ८ वसु. १) धर, २) ध्रुव, ३) सोम, ४) अह:, ५) अनिल, ६) अनल, ७) प्रत्यूष आणि ८) प्रभास (संदर्भ: महाभारत, आदि. ६६/ १८) *११रुद्र १ हर, २ बहुरूप, ३ त्रयम्बक, ४ अपराजित, ५ वृषाकपि, ६ शंभू, ७ कपर्दी, ८ रैवत, ९ मृगव्याध, १० शर्व आणि ११ कपाली. (संदर्भ: हरिवंश, १/३/ ५१-५२) आणि याखेरीज २ अश्विनीकुमार...! असे सारे मिळून ३३ प्रकारचे देव होतात.. असा हा सर्व प्रकार आहे, हे बुद्धिवानांनी व विचारवंतांनी नीट समजून घ्यावे.. यापेक्षा पूर्ण आणि अधिक माहितीसाठी कंसात दिलेले संदर्भग्रंथ पाहावेत..... ॥जय जय रघूवीर समर्थ॥

84 likes 2 shares
WhatsApp