R
Reyansh Bhat
Friendship · Marathi · Friendship
*८३७🍁कशाचा वारसा पुढे नेणार?* इफिक्रिटस हा एक बलाढ्य सेनापती होता. पण मूळचा सामान्य कुळातला होता. साहजिकच त्याचा मत्सर इतर सरदार करीत. हार्मोडियस नावाचा एक श्रीमंत वंशपरंपरागत मोठा सरदार होता. त्याने एक दिवस इफिक्रिटसशी भांडण शोधून काढले. तो म्हणाला, _"तू सामान्य कुळातला आहेस."_ इफिक्रिटस यावर मुळीच चिडला नाही. तो हार्मोडियसला म्हणाला, _"मित्रा, तुझ्या कुळाचा मोठेपणा तुझ्या वडिलांपाशी संपला आहे आणि माझ्या कुळाचा मोठेपणा माझ्यापासून सुरू झाला आहे."_ *नव्या पिढीने आईवडिलांचे नुसते गुण गाऊन संतुष्ट राहू नये, तसे त्यांना दोषही देऊ नये.*
102 likes
86 shares