Back to feed
A
Ayaan Chauhan Love · Marathi · Romantic

Facebook वर असंख्य मुलींना शोधता शोधता एका मुलीला त्यानं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली ..... सुंदर प्रोफाईल फोटो असणार्या त्या मुलीनं मात्र त्या मुलाची ती रिक्वेस्ट कॅन्सल पण केली .... पण तो मुलगा सारखं सारखं तिला रिक्वेस्ट पाठवायचा....आणि ती इग्नोर करायची .... सारख्या त्रासाला वैतागून एक दिवस त्या मुलीने त्याची रिक्वेस्ट स्विकारली... तो मुलगा रोज तिला good morning , good night, जेवलीस का ...असे मेसेज न चुकता पाठवायचा ... पण ती तिकडे दुर्लक्ष करायची ... पण नेहमी येणारे मेसेज पाहून ती मुलगी हळूहळू त्या मुलासोबत बोलायला लागली .. त्यांची चांगली मैत्री झाली .. तो तिची खूप काळजी घ्यायचा .. दिवसाला शंभर मेसेज करायचा ... असेच 6 महिने निघून जातात...तो मुलगा जहाजावर नोकरी करत असतो आणि पुढचा 6 महिन्यांनी तो परत येणार असतो. हे त्या मुलीला माहीत असतं... जाताना तो मुलगा तिला मेसेज करतो की "आपण फ्रेंडशीप मध्ये एकमेकांच्या प्रेमात पडलोय का..??..तु माझ्यावर प्रेम करतेस का..??" तेव्हा ती मुलगी म्हणते की तु इथे नसताना जर मी तुला miss केलं तर आल्यावर सांगेन तुला माझं उत्तर ..."" तो मुलगा निघून जातो त्याच्या नोकरीत .. इकडे त्या मुलीला रोज त्याची आठवण येत राहते... त्यानं नेहमीप्रमाणे मेसेज करावं असं वाटत राहतं कारण ती त्याच्या प्रेमात पडलेली असते... काही दिवसांनी तिला एक call येतो आणि तो त्या मुलाच्या मित्राचा असतो आणि तो मुलगा पाय घसरून डोक्यावर पडलेला असतो आणी त्यातच त्याचा मृत्यू झालेला असतो .... ती मुलगी खूप रडते ... ती जेव्हा पण facebook उघडते तेव्हा तिला नेहमीच वाटत असतं की त्या मुलाचा मेसेज आला असेल ... पण आता रडण्याशिवाय तिच्याजवळ बाकी काहीच शिल्लक नाही ... म्हणून मित्रांनो ...मनमोकळं बोलत चला..आपल्या भावना आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत शेअर करत चला....

0 likes 0 shares
WhatsApp